यवतमाळ सामाजिक

दिव्याग निखिल येवले नऊ महिन्यापासून बेपत्ता

शोध घेण्यात सेलू पोलीस अपयशी

जवळच असलेल्या मसाळा येथील दिव्याग निखिल वामन येवले वय 23 वर्षे याचा शोध घेण्यात सेलू पोलिसांना अद्यापही यश आले नाही.
मसाळा येथील दिव्याग निखिल येवले हा जानेवारी 21 पासून बेपत्ता आहे.नागपूर येथे जातो असे सांगून घरून तो गेला आणि अद्यापही परत आला नाही, निखिल च्या बेपत्ता होण्याची तक्रार 29 जानेवारीला सेलू पोलिसांकडे करण्यात आली होती.सुरवातीला पोलिसांकडून सर्वकष चौकशी करण्यात आली होती. घरच्या मंडळींकडून घातपात झाल्याची शंकाही वर्तवली होती ,परंतु पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही.गेल्या आठ महिन्यापासून नातेवाईक आणि पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु अद्यापही तो मिळून आला नाही. निखिल हा संशयास्पदरित्या बेपता झाला असून त्याचा सर्वंकष शोध घ्यावा अशी मागणी आई वडिलांनी केली आहे

Copyright ©