Breaking News यवतमाळ सामाजिक

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

 

शहरातील पुसद-दिग्रस पुलाच्या उजव्या बाजूला असलेल्या शेतातील एका झाडाला युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.३ सप्टेंबर) दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान घडली. दर्शीत उमेश दुधे, रा.बारीपुरा, दिग्रस, असे मृतक युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिग्रस-पुसद पुलाच्या उजव्या बाजूला असलेल्या शेतातील एका झाडाला एका युवकाने गळफास घेतल्याची चर्चा होऊ लागली . सदर घटनेची माहिती दिग्रस शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती दिग्रस पोलिसांना मिळताच तात्काळ पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आणला. सायंकाळी ६.३० वाजता मृतदेहाचे शवविच्छेदन सुरुच होते. आत्महत्या का केली याबाबत अद्याप कारण कळाले नसून सदर घटनेचा पुढीप तपास पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विशाल बोरकर, सहाय्यक उपनिरीक्षक गुणवंत गोटे, शालीक राठोड व पोलीस कर्मचारी करित आहेत.

Copyright ©