यवतमाळ सामाजिक

सलग पाचव्यांदा “बँको अवार्ड “ने गोदावरी अर्बन सन्मानित

 

राज्यातील सहकार क्षेत्राला बळकट करण्यासाठी भरीव योगदान देत नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल अव्हिज पब्लिकेशन द्वारा आयोजित बॅंको अँडव्हान्टेज सहकार परिषदेत सहकार क्षेत्रातील नामवंत असलेला ‘बँको अवार्डने’ गोदावरी अर्बनला सलग पाचव्यांदा सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्याचे वितरण सायलेंट शोअर रिसोट, मैसूर,कर्नाटक येथे करण्यात आले होते.यावेळी ना. सौ. शशिकला जोल्हे कॅबिनेट मंत्री, कर्नाटक , खासदार अण्णासाहेब जोल्हे , यांच्या शुभहस्ते गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, मुख्यालय मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे,वरिष्ठ शाखा व्यवस्थापक रवि इंगळे,अधिक्षक विजय शिरमेवार नांदेड , शाखा व्यवस्थापक सर्वश्री अमित पिंपळकर यवतमाळ, गिरीश आस्टोनकर अमरावती , शैला गंपावार घाटंजी , राघवेंद्र राव सप्पा विजयवाडा , रामचंद्र मूर्ती अमलापुरम आन्र्दप्रदेश , श्रीकांत बुर्ला सिलसिला तेलंगणा , शिवा क्रिष्णा ,रायचूर कर्नाटक , सहाय्यक व्यवस्थापक ( क्रेडिट ) अनिकेत मोहदरे, यांना देण्यात आला.

राज्याच्या सहकार क्षेत्रात गोदावरी अर्बन कायमच आपल्या नाविन्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे आपले वेगळेपण जपत आहे.महाराष्ट्र,आंध्रप्रदेश,तेलंगाणा, कर्नाटक व गुजरात या पाचही राज्यातील सर्व शाखा अद्ययावत तंत्रज्ञानासह सुसज्ज असून आलेल्या प्रत्येक ग्राहकांचे प्रसन्न आणि हसतमुखाने स्वागत करणारे उच्चविद्याविभूषित प्रशिक्षीत अधिकारी कर्मचारी विनम्र व तत्पर सेवा देतात हे विशेष. सभासदांचे हित , ठेवींची सुरक्षितता , तळागाळापर्यंत बॅंकिंग सेवा पोहचविणे हा मुख्य उद्देश आहे. या कार्यशैलीमुळे गोदावरी अर्बन ने सहकार क्षेत्रातील अनेक विक्रम मोडीत काढलेत व अनेक स्वतः निर्माण केले आहेत.बँको पुरस्काराची निवड विविध परिक्षणांमधून केली जाते बँकेच्या कामकाजाची आणि अहवालाची कसून तपासणी करतात ही अत्यंत कठीण निकषांवर असते,या निवड समितीमध्ये रिझर्व्ह बँकेचे तज्ञ अधिकारी व बॅकिंग क्षेत्रातील मान्यवर परीक्षक म्हणून काम पाहतात वरील सर्व निकषात संस्था अव्वल ठरल्यामुळे अव्हिज पब्लिकेशन च्या वतीने गोदावरी अर्बनला सलग पाचव्यांदा बँको अवार्ड देऊन गौरवाकिंत करण्यात आले आहे.

गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील व अध्यक्ष राजश्री पाटील यांनी संचालक,कर्मचारी,दैनिक आवृतठेव प्रतिनिधी,सभासद,ठेवीदार यांचे पुरस्कार मिळाल्या बद्दल अभिनंदन करीत आपल्या ग्राहकांचे आणि अव्हिज पब्लिकेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Copyright ©