यवतमाळ सामाजिक

सेलू येथे पोलिस व सैन्य भरती पुर्व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

 

आकोली वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात क्रिडा संकुलन येथे वंदे मातरम डिफेन्स अकॅडमी महाबळा कडून पोलिस व सैन्य भरती पुर्व परिपूर्ण मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर 9 सप्तेबंर ते 13 सप्तेबंर 2021. या कालावधीत होत आहे तसेच शिबिराचा वेळ सकाळी 6 ते 9 पर्यत असणार व 5 दिवशीय शिबिर राहणार आहे. माजी सैनिक रघुनाथजी मोहिते, माजी सैनिक युवराजजी चांभारे, माजी सैनिक मोहन गोमासे, माजी सैनिक लक्ष्मण गोमासे, माजी सैनिक मुकेश भावरकर, माजी सैनिक पुरुषोत्तम बजाईत यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पाडण्यात येईल, तसेच यात पोलीस अधिकारी व अन्य अधिकारी यांचे मार्गदर्शन सुधा लाभणार आहे वर्धा जिल्ह्यातील युवक मंडळींना या शिबिराचा मोठा लाभ होईल.
वर्धा जिल्ह्यात युवक गावो गावी पोलिस व सैन्य भरती साठि धडपड करीत आहे, या शिबिरात त्यांना आपली योग्यता व निश्चित माहिती पडेल, व त्यांच्या मनात एक नविन उत्तेजना निर्माण होईल, युवक मंडळींना भारत मातेच्या संरक्षणासाठी नेमके कशा पद्धतीने तयार होता येईल, असे वंदे मातरम डिफेन्स अकॅडमी चे संचालक सतिश गोमासे पुर्ण पणे प्रयत्न करीत आहे. तसेच जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संचालकानी केले आहे.

Copyright ©