यवतमाळ सामाजिक

दिव्यांग वृध्द निराधार बांधवांनी आपली संघटित शक्ती निर्माण करावी सस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल

 

बिलोली :-तालुक्यातील कुंडलवाडी येथे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी मेळावा संपन्न झाला.प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, बिलोली ता अध्यक्ष बालाजी होनपारखे, ता सचिव संतोष नरवाडे, गायकवाड, ईतर पाहुण्याचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
सुञसंचलन शिवकुमार गंगोने यानी केले
प्रस्ताविक सयाराम भोरे दिव्यांगाचे कैवारी मा डाकोरे बसमध्ये झालेली भेट व ते दिव्याग, वृध्द निराधार यांच्या साठी करीत असलेल्या चवळीची माहिती असल्यामुळे मी त्यांना कुंडलवाडी नगरीत दिनदुबळ्या साठि मेळावा घेण्याची विनंती केल्यानंतर दोन दिवसात भव्य मेळावा आपल्या साक्षीने संपन्न होत आहे या मेळाव्यात डाकोरे पाटिल यांचे मार्गदर्शन घेऊन शासन प्रशासन जागे करण्यासाठी संघटित होण्याचे आव्हान केले.
या कार्यक्रमात साविञीबाई, समेटवार, गायकवाड इत्यादीने मनोगत व्यक्त केले
ता अध्यक्ष बालाजी होनपारखे यांनी दिव्यांग मेळाव्याचा उद्देश व दिव्यांग बांधवांच्या अडचणीत संघटनेने शासन स्तरावर कशी सोडवणूक करीत आहे त्यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे असल्यामुळे सर्वानी संघटित होण्याचे अव्हाहण केले.
संस्थापक अध्यक्ष मा.डाकोरे पाटिल यांनी दिव्याग बाधवानी संघटितपणे नांदेड जिल्ह्यात शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी शंभर सनदशीर आंदोलन केल्यामुळे आज दिव्यांग बांधवाना गाव पातळीवर सवलती मिळत आहेत सर्व सवलती मिळण्यासाठी गाव तिथ दिव्यांग संघटनेच्या बोर्डाचे शाखा स्थापन करून आपला हक्कासाठी दिव्यांग वृध्द निराधार यांनी संघटितपणे संघर्ष केल्याशि़वाय न्याय मिळत नसल्यामुळे दिव्यांगानी आपल्या शरीरातील व्यंग असल्यामुळे खचित न होता दिव्यांग बुध्दीने चातुर्य असुन त्या बुध्दी चा वापर करून दिव्यांग होने का गम नहि हम किसी से कम नही हे दाखविण्यासाठी संघर्षात सामिल होऊन आपला हक्क मिळवून घेण्यासाठी सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांनी संघटितपणे नांदेड जिल्ह्यातील कुंभकर्ण शासन प्रशासनास जागे करण्यासाठी गाव तेथे दिव्यांग संघटनेच्या शाखा स्थापन करून दिव्यांगाची शक्ती निर्माण करून कुंभकर्ण शासन प्रशासन खडबडून जागे करण्यासाठी बोर्डाचे स्थापना करावी.
दिव्यांगाना कोणीही आधार देत नसल्यामुळे शासनाने जंगल जमीन, गायरान जमीन, मसुुरा जमीन, परमपुक जमीन, सिलिंग जमिन दिव्यांग बांधवांच्या नावावर दिले तर त्या दिव्यांगाना मान सन्मान व सर्व सामान्य जनतेसाठी त्यांना सन्मानाने त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना जगवतील व शासनास महसुल जमा होऊन शासनाच्या तिजोरीत वाढ होईल. दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत, पचायत समिती, जिल्हापरिषद,नगरपंचायत
,नगरपालिका महानगर पालिका, खासदार, आमदार निधी, घरकुल, ईत्यादी सवलतीसाठी आपण संघटितपणे संघर्ष करण्यासाठी सहभागी व्हावे असे आव्हान डाकोरे पाटिल यांनी केले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी विनोद काळेवार ,दता हमद, नारायण थोसे, अनिल पेंटावार, साई येपुरवार, गंगाधर कल्यापुरकर, रामजी गायकवाड, कोंडीबा यडके, पेंन्टलवार,होरके,हंनमत मुरके, सय्यद मोहध्दिन, राजेश परिसरातील दिव्याग बांधव उपस्थित होते असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे
,

Copyright ©