यवतमाळ सामाजिक

हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रात राजकिय हस्तक्षेपामुळे चालला मनमानी कारभार!

———————————————
एकाच आरोग्य परीचारकावर केल्या जातोय अन्याय.
——————————————–
यवतमाळ- तालुक्यातील हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रात राजकिय वरदहस्त संचारल्याने येथिल आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली आहे. येथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या राजकिय पतीदेवाची मर्जी संबंधित अधिकारी जोपासत असल्याने मर्जीतील परिचारिकांना आठवड्यातून केवळ एक दिवस कर्त्यव्य बजावण्याचे आदेश तर सदैव प्रामाणिक कर्त्यव्य बजाविन्याऱ्या कंत्राटी परिचारिकेस सतत आठवडाभरही १० तास सेवा देण्याचे फर्मान तालुका आरोग्य अधिकारी यांनी आदेश काढून एकाधिकार वापरून मनमानी कारभार चालविल्याचे पुढे आले आहे.
कोरोना आजारासोबतच डेंग्यू, मलेरिया सारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले असतानाच हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रात राजकिय मर्जी जोपासत राजकारण्यांनी सांगितल्या प्रमाणे बाकी परीचारकाना अकरा दिवसात एक दिवस सेवा तर जे प्रामाणिक कर्त्यव्य बजावित असतात ज्यांचे कोणी बोलणार नाही अश्या कंत्राटी परिचारिकेस मध्ये कुठेही खंड न ठेवता लगातार एकरा दिवस सेवा बजाविण्याचा आदेश दिनांक २६/८/२०२१ ला निर्गमित केल्याचा चमत्कार तालुका आरोग्य अधिकाऱ्याने घडविला आहे. बाकीच्यांना आठ दिवसात एक दिवस आणि एकाच परीचारिकेला सतत सेवा देण्याचे फर्मान या मागील कारण काय? बाहेरील राजकिय लोकांचे ऐकून या परीचारकेला का वेठीस धरल्या जात आहे. हा संशोधनाचा विषय दिसत असल्याने गावातील सुज्ञ नागरिक व ग्राम पंचायत सदस्य या परीचारकावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धावून येवून याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांना विचारणा केली असता माझ्या हातात काहीच नाही. या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना विचारणा करा असे बेजबाबदार व्यक्तव्य करून वेळ मारून नेली. त्यामुळे या आरोग्य केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना राजकीय सहकार्य नसले की अन्याय सहन करावे लागणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे येथिल आरोग्य सेवेचा पुर्णतः फज्जा उडाला आहे. येथिल आरोग्य सेवेवर वरिष्ठांचे दुर्लक्ष असल्याने या आरोग्य केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या रुग्णाची गैरसोय होत आहे. हे आरोग्य केंद्र केवळ राजकीय मंडळी ची मर्जी जोपासून नावाला सेवा देत आहे. येथिल एकाधिकार पद्धत शासन नियमाला डावलून करीत असून प्रामाणिक कर्मचाऱ्यावर अन्याय करणारा आहे. त्यामुळे येथिल राजकीय दबाव नष्ट करून सर्व कर्मचाऱ्यांना सारखा न्याय द्यावा तर कायम स्वरुपी महिला डॉक्टर ची नियुक्ती करावी अश्या स्वरूपाचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना जिल्हा परिषद सदस्य रेणूताई संजय पाटील शिंदे यांच्या नेतृत्वात ग्राम पंचायत सदस्य तथा सुज्ञ नागरिकांनी देवून येथिल कार्यात पारदर्शकता आणावी अशी मागणी केली आहे. तसे न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.

Copyright ©