Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह ; तीन कोरोनामुक्त

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2154 बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 03 सप्टेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात एक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला तर तीन जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 18 आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1529 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 1528 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72861 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71056 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये आर्णी येथील एका पुरूष रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 24 हजार 370 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 51 हजार 315 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.06 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.07 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2154 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 20 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2154 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 16 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 771 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 4 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 751 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

______________________________________

मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्याकरीता विशेष लक्ष केंद्रीत करा

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे निर्देश

 

यवतमाळ दि. 03 सप्टेंबर : कमी वयातील प्रसुती, उच्च रक्तादाब, हिमोग्लोबीन चे प्रमाण कमी असणे, प्रसुतीच्या वेळी अधीक रक्तस्त्राव होणे, वेळेत वाहन उपलब्ध न होणे,गळ्याला नाळ आवळणे, वेळेत रक्त तपासणी व सोनोग्राफी न होणे, अॅनेमिक असणे, बाळाला निमोनिया होणे इ. कारणांमुळे मातामृत्यू व बालमृत्यू चे होत असून हे मृत्यू थांबविण्यासाठी आजारी रुग्णांची हाय-रिक्स व लो-रिक्स गटात विभागणी करून त्यांचेवर विषेश लक्ष केंद्रीत यावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधीकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आरोग्य विभागाला दिले.

मातामृत्यू व बालमृत्यू रोकण्याकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यानी त्याचे कक्षात आरोग्य यंत्रणेचा संबंधीत रूग्ण नातेवाईक यांचे समक्ष आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सिक डॉ तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, जिल्हा माताबाल संगोपण अधिकारी डॉ. सुहास कोरे, गायनिक अशोशिएशनच्या डॉ. वृषाली माने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. विशाल नरोटे, डॉ. स्वाती मरसकोल्हे, डॉ. सचिन पदमावार, डॉ. विशाल चव्हाण , डॉ.विनोद राठोड, डॉ. नरेद्र आडे, डॉ. जया चव्हाण, डॉ. एस वारोळे, डॉ. एन.बी.चवरे, जिल्हा नर्सींग ऑफीसर वदंना ऐडस्कर, मनीषा तिरपुडे, प्रसाविका सविता राउत, एम.मडके, सिमा लोखंडे, एम.डी. कोठेकार, सि.आर मस्के, सुरेखा मेश्राम, अर्चना कदम तसेच रूग्णाचे नातेवाईक रत्नमाला दरोडे, ताईबाई इंगोले, नारायण भंडगे इ. उपस्थित होते, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

Copyright ©