महाराष्ट्र सामाजिक

ठाण्याचा संकेत महाडिक यूपीएससी परीक्षेत देशात एकशे अकरा क्रमांकाने उत्तीर्ण होऊन “असिस्टंट कमांडर” पदावर नियुक्ती

 

ठाणे : संकेत रमेश महाडिक गाव रांगव, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, राहणार ठाणे(पश्चिम), पाचपाखाडी, यूपीएससी परीक्षेत देशात एकशे अकरा क्रमांकाने उत्तीर्ण होऊन “असिस्टंट कमांडर” पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाण्याचा रहिवाशी संकेत रमेश महाडिक यांनी २०१८ च्या केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत झालेल्या परीक्षेत सेंट्रल आर्मड पोलीस फोर्सेस मध्ये गुणवत्ता निवड यादीत एकशे अकरा क्रमांकाचे यश संपादन केले आहे. यांची “असिस्टंट कमांडर” या पदावर नियुक्ती झाली आहे.
संकेत रमेश महाडिक यांनी प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल ठाणे(पूर्व) कोपरी, माध्यमिक शिक्षण सेंट जॉन दि बापटीस हायस्कूल ठाणे(पश्चिम) चरई, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण ज्ञानसाधना कॉलेज येथे झाले आहे. तसेच बी ई (पदवी) इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग या विषयात ए.सी.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खारघर येथे प्राप्त केले आहे.
संकेत महाडिक याने सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ठाणे महानगरपालिका येथून स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन घेतले आहे.
त्यांनी २०१८ मध्ये केंद्रीय आर्मड पोलीस फोर्सेसच्या अंतर्गत “असिस्टंट कमांडट” या पदासाठी स्पर्धा परीक्षा दिली होती साडेचार लाख परिक्षार्थींमधून त्यांनी ही परीक्षा एकशे अकरा क्रमांकाने उत्तीर्ण होऊन “असिस्टंट कमांडट” या पदावर नियुक्ती झालेली आहे. संकेत महाडिक हे गेल्या दोन-तीन वर्षांपासून या परीक्षेसाठी अहोरात्र मेहनत करत होते त्याचे फळ त्यांना प्राप्त झाले आहे. मध्यम उत्पन्न गटात जन्मलेला आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती संधीत रूपांतर करून या यशाला त्यांनी गवसणी घातली आहे. रमेश रामचंद्र महाडिक हे गाव-रांगव, तालुका-संगमेश्वर, जिल्हा-रत्नागिरी राहणार ठाणे(पश्चिम) पाचपाखडी येथील रहिवासी आहेत सर्वसाधारण सामान्य कुटुंब असून त्यांच्या मुलाने केलेली ही कामगिरी निश्चितच युवकांसाठी समाजासाठी कौतुकास्पद आहे.
संकेत रमेश महाडिक यांचा दीक्षांत समारोह मसुरी येथे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याहस्ते ८ऑगस्ट २०२१ रोजी संपन्न झाला. तसेच ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे महानगरपालिकेत त्याचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच नगरसेवक पाचपाखाडी राजेश मोरे यांनी त्यांना त्यांच्या घरी येऊन शुभेच्छा दिल्या सर्व गवळी समाजाच्या सामाजिक संस्था, महाड-तळा, दापोली येथील सामाजिक संस्था, मंडळे इत्यादींनी त्यांचा सत्कार केला.
तसेच गवळी समाजाची सामाजिक संस्था गवळी सेवा फाऊंडेशन या संस्थेने संकेत महाडिक यांना त्यांच्या घरी जाऊन भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांची प्रतिमा भेट देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या या प्रसंगी संस्थेचे दिनेश भोजने, विश्वनाथ पाटील, शशिकांत ठसाळ, मोरेश्वर महाडिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. समाजातील असेच अनेक संकेत पुढे घडत राहोत अशी प्रार्थना या वेळी भगवान श्रीकृष्ण चरणी करण्यात आली.
स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी ध्येय, अभ्यासाची चिकाटी, मेहनत, सातत्य ठेवणे हा मूलमंत्र जपा. असा सल्ला संकेत महाडिक यांनी समाजातील युवापिढीला दिला आहे.

Copyright ©