यवतमाळ सामाजिक

शहरातील प्रभाग क्रमांक ७ चा नगरपरिषदेला पडला विसर..!!

 

स्थानिक नगरसेवक धीरज पाते करीत आहे. रस्त्याची स्वखर्चाने डागडुजी व काटेरी झुडपांची सफाई

 

वणी शहरातील साफ-सफाई व रस्त्यावर पडलेल्या खड्याचा प्रश्न ऐरणीवर पडलेला आहे. एकीकडे बीजेपीने सत्ता आल्यानंतर संपूर्ण शहराचा कायापालट करण्याचे काम हाती घेतले आहे .परंतु शहरातील ,प्रभाग क्र.७ हा नगरपालिकेच्या विकास कामाच्या रडारवरुन , गायब झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रभाग क्र. ७ चा नगरपालिकेला विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसा पुर्वी प्रभाग क्र. ७ मध्ये येणाऱ्या, निर्गुडा नदी वरील गणेशपुर पुलाजवळील, खड्ड्यांमुळे कित्येक मोठ्या दुर्घटना घडल्या आहे. या खड्ड्यांमुळे वयोवृद्ध, बालके,महिला यांचा मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडून आल्या आहे. ही बाब नगरसेवक धिरज पाते यांनी कित्तेकदा नगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिली. परंतु पालिका प्रशासन हे झोपेचे सोंग घेत असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा पालिका प्रशासना सोबत धीरज पाते यांनी पत्रव्यवहार करून, समस्यांची जाणीव पालिका प्रशासनाला करून दिली . परंतु नगरपालिकेवर याचा कुठलाही परीणाम झाला नाही. त्यामुळे नगरसेवक धीरज पाते यांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता प्रभागातील नागरिकांच्या समस्येच्या दृष्टिकोनातून, स्वखर्चाने गणेशपुर पुलाजवळील रस्त्याची संपूर्ण डागडुजी करून, रस्त्या जनतेकरिता खड्डेमुक्त करून ,देण्याचे काम नगरसेवक धिरज पाते यांनी केले. परंतु संपूर्ण प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात खराब असलेले रस्ते व आजुबाजूने वाढलेले झाडे-झुडपे यासंदर्भात कित्येक वेळा नगरपरिषदेला २/३/२०२१ , २९/६/२०२१ व २/८/२०२१ ला पत्रव्यवहार करून सुद्धा नगरपालिकेने सऱ्हास दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे . हीच बाब लक्षात घेत प्रभाग क्रमांक ७ येथील नागरिकांची समस्या लक्षात घेत,नगरसेवक धीरज पाते यांनी स्वखर्चातून झाडे-झुडपे साफ करून, झोपेत असलेल्या नगरपरिषदेला आगळा-वेगळा संदेश दिला आहे. त्यामुळे
सामान्य जनता ही कराच्या माध्यमातून जी रक्कम नगरपालिकेला देते .त्याचा उपयोग जनतेच्या कामासाठी होत नसेल तर त्याचा उपयोग काय..?? असा सवाल प्रभाग क्र.७ मधील नागरिक उपस्थित करीत आहे.

Copyright ©