यवतमाळ सामाजिक

डॉक्टरांच्या अनागोंदी कारोभाराला रुग्णालय प्रशासनाचा पाठिंबा

———————————————-
खऱ्या दिव्यांगासाठी लढा उभारणार
———————————————-
नेत्ररोग शास्त्र विभागातील प्रकार
———————————————-
यवतमाळ: श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय, यवतमाळ येथील नेत्ररोग शास्त्र विभागातील डॉक्टरानी आपल्या आर्थिक कमाई साठि कुठलीही व्यंगत्व नसलेल्या व्यक्तीला दिव्यांग प्रमाणपत्र वितरित केल्याची विश्वसनीय माहिती मिळाली होती हा डॉक्टरचा अनागोंदी कारोभार उघड़किस आणण्यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहितीची मागणी केली परंतु रुग्णालय प्रशासनाने वैयक्तिक व त्रयस्त व्यक्तीच्या माहितीचे कारण पुढे करुण माहिती देण्यास नकार दिला माहिती देण्यास नकार दिल्याने तक्रार दाखल करुण चौकशी व कार्यवाहिची मागणी केली परंतु अद्यापही कुठलीही हालचाल नसल्याने स्पष्ट दिसून येत आहे.की हा संपूर्ण कारोभारात डॉक्टरांसोबत रुग्णालय प्रशासनाची सुद्धा भागीदारी आहे की काय?.बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करुण खऱ्या दिव्यांगाणा त्यांच्या अधिकारापासुन वंचित ठेवण्या मागे डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासन जवाबदार आहे.जो खरोखर दिव्यांग आहे.कुठे तरी भिक मागत आहे.आणि डॉक्टरांच्या आशिर्वादाने तयार झालेले दिव्यांग शासन सेवेत मजा मारत आहे.हा सर्व प्रकार जिल्हाधिकार्यांनी थांबवायला पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना तक्रार दिली मात्र यावर कोणतीच दखल झाली नसल्याने कार्यवाही नाही. त्यामुळे अनेक शंका निर्माण होत आहेत. या गैर प्रकारात ज्यांचे कडे तक्रारी केल्यात त्यांचा तर यात सहभाग तर नसावा असे तक्रारकर्ते पुरुषोत्तम मधुकर कामठे यांनी यांनी शंका निर्माण केली असून येथे न्याय न मिळाल्यास खऱ्या दिव्यांगासाठी वरिष्ठ स्तरावर लढा उभारू असे तक्रारकर्ते पुरुषोत्तम मधुकर कामठे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Copyright ©