यवतमाळ सामाजिक

घाटंजी भुमीअभिलेख कार्यालयाचा बडगा हकलण्यासाठी घर तिथे उपोषण

घाटंजी- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घाटंजी नगर परिषद क्षेत्रातील एकूण ४३० अतिक्रमण धारकांच्या घरकुलाचा डी. पी. आर. प्रस्ताव सन २०१९- २०२० या सालात शासन स्तरावरून मंजूर करण्यात आला. यात लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्याकरिता शासनामार्फत नेमलेल्या त्रिसदस्यीय समिती अंतर्गत घाटंजी भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयाकडून अतिक्रमित जागेची मोजणी होणे अपेक्षित होते. मात्र या कार्यालयाकडून सपसेल दुर्लक्ष करण्यात आल्याने या भूमी अभिलेख कार्यालयाचा बडगा हाकलण्याकरिता घाटंजी शहरात घर त्या ठिकाणी एक दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे.
नगर परिषद हद्दीत येणाऱ्या घाटी या भागात बहुतांश नागरिक हे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. येथिल गरजावंत नागरिक कसेबसे निवाऱ्याची व्यवस्था करून अतिक्रमित जागेवर वास्तव्य करीत आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाचे पाणी त्यांच्या निवाऱ्यात शिरल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली होती. येथिल झालेल्या या दयनीय अवस्थेला केवळ नी केवळ शासन स्तरावरून झालेली दिरंगाई हिच जबाबदार असल्याचे घाटंजी नगर परिषदेचे उपाध्यक्ष शैलेश ठाकूर यांनी नमूद केले आहे. त्यामुळे या दिरंगाई चा परिणाम येथिल गरिब जनतेवर झाल्याने याविषयी भूमी अभिलेख विभागाला जागे करण्यासाठी ठाकूर यांच्या नेतृत्वात घाटंजी भूमी अभिलेख विभागाचा बडगा हाकलण्यासाठी दिनांक ७ सप्टेंबर२०२१ ला घर तिथे उपोषण सुरू करण्यात येईल. या उपोषणाने सबंधित प्रशासन जागे होवून अतिक्रमित जागेची मोजणी करून मंजूर असलेल्या डी. पी. आर. नुसार लाभार्थ्यांना जागेचा पट्टा मिळेल आणि हक्काचे घर मिळेल हा उदांत आमचा मानस पुढे ठेवून या उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे.तरी घर तिथे उपोषण यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. आणि ज्या नागरिकांचे नावे डी. पी. आर. (प्रस्ताव) मध्ये समावेश आहे अश्यानी आपली नावे महाबलाय व्यायाम शाळेत येवून तपासून घ्यावीत या ठिकाणी सदरची माहिती अवगत करून देण्यात येणार असल्याचे नगर परिषदेचे स्विकृत सदस्य सय्यद फिरोज यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Copyright ©