यवतमाळ सामाजिक

दिग्रस तालुक्यातील नावाजलेले मोठे एक गाव , नावाजलेल्या गावाला समशान भूमी चा अभाव

 

आरंभी येथे समशान भूमी नसल्याने उघड्यावरच होतात अंत्यसंस्कार!

तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या आरंभी गावात गेल्या अनेक वर्षांपासून उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहे.विशेष म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे उजाडून गेली.मात्र आरंभीवासीयांची परवड आजही जैसे थे असल्याचे दिसून येते. हि समस्या सोडविण्यासाठी प्रशासन आणखी किती काळ अंत पाहणार,असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहे.
मृत्यू हे अंतिम सत्य आहे, असे म्हटले जाते. ‘मरणाने केली सुटका,जगण्याने मजला छळले होते ‘असे सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांनी लिहून ठेवले आहे. मरणाने सुटका केली तरी ही सुटका गावकऱ्यांसाठी अभिशाप ठरताना दिसते.पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात संबंधित समस्या तीव्र रूप धारण करते. गावाच्या उत्तर आणि दक्षिण भागाला वनविभागाच्या जागेवर ग्रामस्थ अंत्यसंस्कार पार पाडतात. हक्काची आणि शेडयुक्त स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. पावसाळ्यात कधीकधी पावसात भिजून, चिखल तुडवत मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागते,असे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रसंगी मृतदेह पाऊस थांबेपर्यंत घरात ठेवावे लागते.उन्हाळ्यात देखील उन्हातान्हाचे चटके खात उभे राहून लोक अंत्यसंस्काराला हजेरी लावतात. गावात सुरक्षित आणि हक्काची स्मशानभूमी नसल्याची शोकांतिका ग्रामस्थांना अडचणीची ठरत आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणे,मृत व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी खूपच त्रासदायक काम ठरते.आरंभी नजीक असलेल्या चिरकुटा, फुलवाडी,वडगाव,झिरपूरवाडी या छोट्या छोट्या गावात शेडयुक्त स्मशानभूमीची सोय आहे. मात्र लोकसंख्येने मोठे असलेल्या आरंभी गावात ही सुविधा उपलब्ध नाही. पंचायत समितीच्या सभापती पदी आरंभी गावातूनच अनिता दिवाकर राठोड ह्या विराजमान आहेत, दिग्रस मतदार संघाचे लाडके आमदार विकास पुरुष अशी ख्याती असलेले संजय राठोड यांच्याकडे राज्याचे वनमंत्री पद असतांना या विषयाला सरपंचा कडून दुजोरा दिल्या गेला नसेल का असा प्रश्न नागरिकांतून केल्या जात आहे.दिग्रस तालुक्या सह संपूर्ण मतदार संघात अनेक विकास कामे आमदार संजय राठोड यांच्या अथक प्रयत्नानीच होत आहे व निधी उपलब्द करून देण्यात त्यांना जोड नाही.आरंभी ग्राम पंचायत व पंचायत समिती या दोन्ही जागी शिवसेची सत्ता असतांना समशान भूमीचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने ग्रामवाशी संताप व्यक्त करीत असून राजकीय कुरघोडी मुळे समशान भूमीचा विषय प्रलंबित ठेवल्या जात असल्याचे नागरिकातून बोलल्या जात आहे . लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लवकरात लवकर स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावून प्रेताची होणारी विटंबना थांबवावी,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
—————————————-
आरंभी येथील समशान भूमी च्या जागे साठी 2 वर्षा पूर्वी उप विभागीय अधिकारी पुसद यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता त्या प्रस्तावात काही त्रुटी आढळुल आल्याने प्रस्ताव परत करण्यात आला , प्रस्तावातील त्रुटी बद्धल विचारणा करण्यात आली असता.वन विभागाच्या पत्रा चा विषय आहे सोमवारला जतकर येथील त्यांना या विषयी सर्व माहिती आहे हे त्यांच्याकडून जाणून घ्यावे
रमेश खरोडे
गट विकास अधिकारी पंचायत समिती दिग्रस

Copyright ©