यवतमाळ सामाजिक

इंडियन ऑईल डे निमित्ताने घाटंजी लखमाई गॅस एजन्सी कडून विविध कार्यक्रमाचे आयोजन

घाटंजी- तालुक्यातील ग्राहकाच्या सेवेत सदैव कार्यतत्पर राहणारी लखमाई गॅस एजन्सीने इंडियन ऑईल डे चे औचित्य साधून साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
गॅस सेवेसोबतच ग्राहकाचा सन्मान ही आमची ईश्वर सेवा समजत गॅस एजन्सीचे संचालिका सौ माहूरे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार यासह पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीकोन पुढे ठेवून वृक्ष वाटप करण्यात यावे याकरिता कोरोनाचे सर्व निर्बंध बाळगून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात ज्येष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले व वृक्ष वाटप करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान महिलांना गॅस वापरा विषयी नियम सांगून अॅपरान चे वाटप करण्यात आले. त्यानंतर उपस्थित ग्राहक महिला यांच्या हस्ते इंडियन डे चे निमित्त साधून केक कापून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी ग्राहकांनी इंडियन ऑईल प्रती आप आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला लखमाई इंडेन गॅस एजन्सीचे कुणाल माहुरे, व्यवस्थापक गजानन राऊत, सामाजिक कार्यकर्ते राजुभाऊ गावंडे, गजानन बेलखेडे सर, लखमाई इंडेन गॅस एजन्सीचे सर्व कर्मचारी व डिलिव्हरी बॉय यांचे सह असंख्य ग्राहक उपस्थित होते.

Copyright ©