यवतमाळ सामाजिक

महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या नाहक त्रासाला कंटाळून, तूपटाकळी ग्रामवासी यांची दिग्रस पोलीस स्टेशनला धाव

 

तूपटाकळी ग्रामस्थांनी  दिले ठाणेदार आम्ले यांना निवेदन

गेल्या दोन महिन्यापासून तूप टाकळी गावात विद्युत पुरवठा चा सततचा लपंडाव चालू आहे सकाळ, दुपार ,संध्याकाळ तिन्ही पहरी तासोनतास विद्युत पुरवठा खंडित होतच असतो. हा त्रास नित्याचा झाला होता व लोड सेटिंग प्रमाणे विद्युत पुरवठा पुरवला जात होता. तरीसुद्धा ग्रामवासीयांनी कधी या विषयाचा  आव न आणता विधुत वितरण कंपनी च्या कर्मचाऱ्या सहित अधिकाऱ्यांना सहकार्याची भावना ठेवून सहकार्यच केले. मात्र दिनांक 30/8/2021 च्या मध्यरात्रीपासून तुपटाकळी येथील विद्युत पुरवठा कायमचाच बंद झाल्यामुळे 2 दिवस अंधारात काढून काल दिनांक 31/8 /2021ला सायंकाळी अं 9 वाजताच्या दरम्यान तुपटाकळी येथील 30 ते 35 नागरिक पोलीस स्टेशन दिग्रस येथे येऊन पोलिस स्टेशनचे ठाणेदार सोनाजी आम्ले यांना निवेदन दिले. विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कामचुकार पणाने सर्व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे तुपटाकळी येथील विद्युत केंद्राच्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचारी-अधिकारी व गावातील नागरिकात काही अनुचित प्रकार झाल्यास त्यास सर्वस्वी विद्युत् वितरण चे अभियंता जबाबदार राहील याची दिग्रस पोलिसांनी नोंद घ्यावी व संबंधित कर्मचाऱ्यावर व अधिकाऱ्यावर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी लक्ष्मण टेकाळे, अल्ताफ पठाण, शंकर भस्मे, निसार पठाण, चंदन जाधव, हरून धारिवाला ,जयसिंग चव्हाण, भारत शेलकर, गोपाल शिरसागर,पुंडलिक एलधरे व ईतर नागरिक उपस्थित होते

Copyright ©