यवतमाळ सामाजिक

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय एरंडगाव येथील विद्यार्थिनींना मानवविकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

———————————————-
घाटंजी :- तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय एरंडगाव येथील विद्यार्थिनींना मानवविकास मिशन अंतर्गत मधील सायकलींचे दिनांक ३१ ऑगस्ट रोजी वाटप करण्यात आले. यावेळी लाभधारक विद्यार्थिनींना सायकलीचा सुरक्षित वापर व रस्ते वाहन सुरक्षितता या बद्दल माहिती देण्यात आली. बाहेर गावावरून पायदळ येणाऱ्या विद्यार्थिनीना या सायकली मुळे निश्चितच फायदा होणार असल्याने त्यांच्यात समाधानाचे चित्र पहावयास मिळाले. यावेळी सुबोध शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर भाऊ भगत, एस .पी.वेले (मुख्याध्यापक) तसेच विद्यालयातील शिक्षक आर. एस ताटेवार , एन. डी. कोतपेल्लीवार, ए. यु.गावंडे व आर. सी.राठोड तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी गजानन मोडक, राजकुमार थूल व दिलीप राठोड उपस्थित होते.

Copyright ©