यवतमाळ सामाजिक

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत पार पडली शांतता समितीची सभा

——————————————–
यवतमाळ- या वर्षातील सण उत्सवास सुरुवात होत असल्याने यासाठी शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हयाचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीत यवतमाळ शांतता समितीची सभा स्थानिक नगर परिषद हॉल मध्ये पार पडली.
चालू वर्षातील सण उत्साहाला सुरुवात होत आहे. यात जातीधर्माच्या नावावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ साहेब यांच्या संकल्पनेतून “एक नवी दिशा जातीय सलोखा राखण्याचा” हे दृष्टीकोन ठेवून मार्गदर्शन केले. या बैठकीत प्रामुख्याने जातीय सलोखा राखण्याच्या दृष्टीकोनातून कोणकोणते प्रयत्न केले पाहिजेत यावर बोलताना म्हणाले प्रत्येक धर्मातील जनतेनी एकमेकांच्या जातीधर्माबद्दल आदर करायला पाहिजे प्रत्येकानी आपआपला सण उत्सव कायद्याच्या चकोरीत राहून पार पाडायला हव्यात. प्रत्येकांच्या गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व सदस्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. कोरोना महामारीच्या आजाराने थैमान घातले असल्याने त्याचे निर्बंध बाळगणे गरजेचे आहे असे नमूद करण्यात आले. यावेळी मुस्लिम युवा सेवा संघाचे तथा पोलीस मित्र युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जावेद अली खान यांनी गावपातळीवरील शांतता व सुव्यवस्था विषयी चर्चा केली. या बैठकीला पोलीस उपअधीक्षक खंडेराव धरणे, यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन चे ठाणेदार पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे, वडगांव (जंगल) पोलीस स्टेशनचे ठाणेदार पवनकुमार राठोड यांचे सह मरकज मौलाना ईबराईम सहाब, सिकंदर जावेद अली काझी, जाकिर उमर, नितिन धोंगळे, मोहसीन भाई इमरान भाई गोपनीय शाखेचे जाधव यांचे सह शांतता कमिटीचे गावागावा वरून आलेले मान्यवर सदस्य व पोलीस पाटील हजर होते. असे एका प्रसिध्दी पत्रकातून शांतता कमिटी चे सदस्य जावेद अली काझी यांनी कळविले आहे.

Copyright ©