यवतमाळ सामाजिक

जवळा येथे लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

 

४० टक्के लसीकरण पूर्ण.

तालुक्यातील सर्वात मोठे असलेल्या जवळा गावात कोरोना काळापासून ते आजपर्यंत ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी ,आशा वर्कर यांचे मोलाचे कार्य आहे कोरोना काळात कोरोना समितीद्वारे गावात घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेणे लक्षणे असलेल्या रुग्णांची कोरोना तपासणी करून घेणे पॉझिटिव रुग्णांना कोविड सेंटरला पोहोचविणे व गावात जनजागृती करणे यात कोरोना समितीने वेळोवेळी मोलाचे योगदान दिले त्यामुळे एकेकाळी गावात 40 रुग्ण आढळून सुद्धा एका महिन्यात गाव कोरोणा मुक्त करण्यात यश आले.
तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हटल्यावर लसीचा तुटवडा जाणवणारच तरी सुद्धा आरोग्य विभागाच्या टीमने वेळोवेळी तालुका अधिकाऱ्यांना लसीच्या पुरवठ्याची मागणी करून गावांमधील ग्रामपंचायत मध्ये आजपर्यंत सोळा वेळा लसीकरण कॅम्प लावले व गावाचे 40 टक्के लसीकरण करून घेतले 14 तारखेला लसीकरणा दरम्यान गावातील महिलांची एकच गर्दी झाली होती त्यामुळे काही वेळ लसीचा तुटवडा जाणवला मात्र जवळा येथील आरोग्य कर्मचारी एस,डी, किनाके यांनी तातडीने तालुका अधिकाऱ्यांना फोन करून अतिरिक्त लसी मागून घेतल्या व उर्वरित नागरिकांचे लसीकरण केले सुरुवातीपासून च्या नियोजनामध्ये श्रुती बांगर, ग्रामसेवक चंद्रकांत पीलावण, शेख इमरान, एस डी किनाके, पुष्पा साखरकर, विजया तायडे ,अर्चना मानकर, भारती लिंगडवार, वंदना पवार आदींचे मोलाचे सहकार्य आहे.

Copyright ©