यवतमाळ सामाजिक

महा आवास अभियान पुरस्काराने जवळा ग्रामपंचायत सन्मानित.

 

यवतमाळ जिल्ह्यातून मिळाला प्रथम पुरस्कार.

तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतीला महा आवास योजनेअंतर्गत 15 ऑगस्ट ला उत्कृष्ट कामगिरी बद्दल यवतमाळ जिल्ह्यातून प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या दरम्यान राबविण्यात आले सदर अभियान काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचे पुरस्कार वितरण करण्याचा कार्यक्रम 15 ऑगस्टला माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे संपन्न झाला यात आर्णी तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक चंद्रकांत पिलावन यांनी महा आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जवळा ग्रामपंचायतीला यवतमाळ जिल्ह्यातून प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे पालक मंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी पांचाळ,जी.प.अध्यक्ष कालींदा ताई पवार, आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, डी. आर.डी.ठमके यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन जवळा येथील सरपंच प्रणिता आडे, उपसरपंच बाबाराव खोडनकर, ग्रामपंचायत सदस्य संजय कवटकर, विस्तार अधिकारी विजय ठेंगेकर, ग्रामसेवक चंद्रकांत पिलावण यांच्या उपस्थित पुरस्काराने जवळा ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले.

Copyright ©