यवतमाळ सामाजिक

——————————————-
कळंब- मंगळवार सायंकाळी च्या सुमारास कळंब येथे दोन मोटारसायकलींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात तीन चालक जखमी झाले पहुर गावातील रहिवासी मोटारसायकलवर कळंब, वरून पहुर गावी जात होते. दुसरीकडे, देवनाळा येथील रहिवासी मोटरसायकलवरून कळंब कडे कामासाठी येत होता. दोन्ही दुचाकीस्वार कळंब परिसरात जात होते की दोन्ही दुचाकींमध्ये समोरासमोर टक्कर झाली. यामुळे दोन्ही दुचाकीवरील तिघेही जखमी झाले. कळंब येथील रुग्ण सेवक अनुप भालेराव,पंकज जयस्वाल, शाम धानरे,मेघराज मस्कर यांच्या मदतीने तिन्हीही जखमींना तातडीने कळंब रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, त्यांच्यावर उपचार करून त्याच्या नातेवाईक यांना माहिती दिली.
माणुसकीचे जिवंत उदाहरण कळंब येथील रुग्ण सेवक कुठेही अपघात झाला की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावून जातात. त्यांचे जखमींच्या नातेवाईकांनी आभार मानले असून जखमींवर उपचार सुरू आहे.

Copyright ©