यवतमाळ सामाजिक

डेंगूआजाराच्या गंभीर स्थितीवर आरोग्य यंत्रणा गप्प का? लवकर उपाय योजना करण्यात याव्या. – उपनगराध्यक्ष शैलेश ठाकूर

———————————————-
घाटंजी- येथील इंदिरा आवास परिसर हा आदिवासीबहुल आहे गोंड समाज कोलाम समाजासह येथे मातंग समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे हा भाग पूर्ण झोपड पट्टीक्षेत्राचा आहे जिल्ह्यात डेंगू आजाराची परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच जिल्ह्या सह घाटंजी येथील इंदिरा आवास परिसरात वृद्ध म्हाताऱ्या सह अनेक लहान मुले डेंगू आजाराच्या विख्यात येत असून घरोघरी दोन ते तीन पेशंट दिसून येत आहे यावर तालुका आरोग्य अधिकारी व त्यांची यंत्रणा सुस्त व झोपी गेल्याचे सोंग करीत आहे घाटंजी तालुक्यातील नागरिकाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेले ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना अनेक वेळा डॉक्टर नसल्याचे सांगितले जाते जवळपास तालुक्यातून शेकडो रुग्ण या दवाखान्यात येतात त्यांची या ठिकाणी गैरसोय होते असे उपनगराध्यक्ष शैलेश ठाकूर यांनी म्हटले पावसाळ्याच्या वातावरणामुळे घाटंजी शहरात ग्रामीण भागात डेंगू सह इतर साथीच्या रोगाचे रुग्ण वाढत आहे औषधी साठा व्यवस्थित उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना आल्या पावली परत जावे लागत आहे असे कळते तेव्हा या बाबीला सर्व नागरिक त्रस्त तेव्हा तालुका आरोग्य अधिकारी व त्यांची यंत्रणा यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे कळते
घाटंजी नगरपालिकेकडून डेंगू डास निर्मूलनाच्या फवारणी सह इतर स्वच्छतेच्या कामाची मोहीम राबविण्यात येणार परंतु तालुका आरोग्य विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे साथीच्या आजाराच्या या भयावह परिस्थिती तालुका आरोग्य विभागाकडून आरोग्य शिबिराची मागणी आहे साथीच्या आजारांनी घाटंजी परिसरात थैमान घातलेले आहे वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात डेंगू सारखे आजार व इतर साथीचे रोग शहरात पसरल्या शिवाय राहणार नाही लवकरात लवकर उपाय योजना आरोग्य विभागाच्या प्रशासनाकडून झाली नाही तर मोठ्या आंदोलनाचा इशारा घाटँजी नगरपालिकेचे उपाध्यक्ष शैलेश ठाकूर यांनी दिला आहे त्यांनी असे कळविले आहे की सर्वसामान्याच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने हे आंदोलन आरोग्य विभागाला आजारी पडेल असे ठाकूर यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे असेल असे आतिश मंथनवार प्रसिद्धीप्रमुख घाटी घाटंजी शहर विकास आघाडी यांनी कळविले

Copyright ©