Breaking News यवतमाळ सामाजिक

अंजी नाईक येथे पंगतीच्या जेवनातुन 45 जनांना विषबाधा.

 

आर्णी  तालुक्यातील अंजी नाईक येथे 45 जनांना पंगतीच्या जेवनातुन विषबाधा झाल्याची घटना दिनांक 16 ऑगष्ट ला रात्री 8 च्या दरम्यान घडली आहे
अंजी नाईक येथील रहिवासी रवींद्र  धनसिंग राठोड  यांच्या घरी धार्मिक  कार्यक्रम होता या कार्यक्रमाला नातेवाईकांसह शेजारिल नागरिकांना निमंत्रण देण्यात आले होते तसेच कार्यक्रमामध्ये जेवनाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारला रात्री 8 च्या दरम्यान जवळ पास 45 जनांनी या कार्यक्रमात जेवन करुन आप आपल्या घरी निघुन गेले
दिनांक 17 ऑगष्ट ला सकाळी 4 च्या दरम्यान पोटात दुखणे, संडास व उलट्या सुरु झाले.
गावातील नागरिकांनी सर्वांना भांबोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले.परंतु काहींची तब्बेत खालावत असल्याने त्यांना पुढिल उपचारा करिता आर्णी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेला व मुलाला पुढिल उपचारा करिता यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविले आहे. विषबाधा झालेल्या  व्यक्तीवर भांबोरा येथील  वैद्यकीय अधिकारी पवार व आर्णी  येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनिल भवरे व नितिन  लकडे यांनी तत्काळ उपचार करुन  परिस्थीतीवर नियंत्रण मिळवीले आहे.

 

*जेवनातुन विषबाधा झालेले नागरिक*

अंजी नाईक येथील पंगतीच्या जेवनात विषबाधा झालेल्या नागरिकांमध्ये विशाल चव्हाण ,खुशाल चव्हाण ,युवराज चव्हाण ,ममता चव्हाण ,छकुली चव्हाण ,नवीन चव्हाण ,संजय राठोड ,विष्णू चव्हाण ,राजू पवार ,सुरज राठोड ,हर्षद राठोड ,गोपाल पवार ,प्रवीण राठोड ,दिनेश राठोड ,किसनबाई राठोड ,धनश्री राठोड ,मंजी चव्हाण ,मोहन राठोड ,बलदेव चव्हाण ,मनिष राठोड ,विवेक राठोड ,सुरेश राठोड ,धीरज राठोड ,धनसिंग राठोड ,रवी राठोड ,गजानन राठोड ,रेखा राठोड ,पद्मा राठोड ,प्रतीक्षा राठोड ,भूमिका राठोड ,शोभा राठोड ,शीतल राठोड ,अरविंद राठोड ,सुखदेव राठोड ,विवेक राठोड ,उमेश राठोड ,गणेश राठोड ,जितेंद्र राठोड ,विजय राठोड ,मधुकर राठोड ,सुनिता राठोड व गजानन जाधव यांचा समावेश असुन सर्वांना आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.

अंजी नाईक या गावी पंगतीच्या जेवणामध्ये वरण-भात-भाजी-पोळी व जिलेबीचे जेवण केले जिलेबी मुळे चाळीस रुग्णांना विषबाधा झाली आहे चाळीस रुग्ण ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे भरती झाले होते त्यापैकी एक महिला रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले उर्वरित 39 जणांची प्रकृती आता स्थिर आहे.
वैद्यकीय अधीक्षक
डॉ.सुनील भवरे आर्णी.

Copyright ©