यवतमाळ सामाजिक

लिंगायत समाज आंतरराज्यीय वधु-वर परिचय मेळावा,यवतमाळच्या वेबसाईटचे उद्घाटन

 

{ वधु-वर परिचय मेळावा 14 नोव्हेंबरला}

यवतमाळ:आज सर्वत्र कोरोणाचे साम्राज्य पसरले आहे, कुणालाही आपल्या घरा बाहेर निघणे पण कठीण झाले, उपवर-वधूच्यां पालकांना लग्न जमवीतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे
हीच समस्या ओळखून वीरशैव हितसंवर्धक मंडळाने मागील वर्षी महाराष्ट्रातील पहिला आंतरराज्यीय ऑनलाइन वधु वर परिचय मेळावा घेतला, त्याला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता, या वर्षी त्यामध्ये सुधारणा करीत वीरशैव हितसंवर्धक मंडळाने आजच्या डिजिटल युगात पुन्हा एक पाऊल पुढे टाकत www.lingayat yavatmal.com ह्या वेबसाईटची निर्मिती केली.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार श्री मदन भाऊ येरावार यांच्या शुभहस्ते या वेबसाइटचे उद्घाटन करण्यात आले.सुंदर आकर्षक आणि सुटसुटीत अशी ही वेबसाइट लिंगायत समाजाकरता निर्मित करण्यात आली,
ह्या वेबसाईट मध्ये उपवर- वधुना मेळावा फॉर्म भरणे अधीकच सोईचे होईल,
याप्रसंगी बोलताना मदन येरावार म्हणाले लिंगायत यवतमाळ ह्या वेबसाईटचे अवलोकन करतांना हि वेबसाईट समाजाच्या उत्कर्षा करिता मैलाचा दगड ठरेल तसेच समाजाने काळाची पावले ओळखून डिजिटल माध्यमातून वेबसाईट द्वारा ऑनलाईन मेळावा आयोजित केला आहे, यवतमाळ जिल्ह्याया करीता हि अभिमानाची बाब आहे,यवतमाळचे नाव ह्यामुळे राज्याबाहेर सु्ध्दा गर्वाने घेतले जाईल, लिंगायत समाज अल्प असुन सुध्दा वीरशैव हितवर्धक मंडळ वेळोवेळी सामाजीक उपक्रम घेवुन समाजाच्या उन्नती करता नेहमी कार्यरत राहत ही खूप चांगली गोष्ट आहे.इतरांनी सुद्धा लिंगायत समाजाचा आदर्श घेऊन कोरोणा काळात ऑनलाइन परिचय मेळावे घेऊन पालकांना संकटसमयी मदत करावी असे म्हणत आजपासुन मेळावा नोंदणी सुरू झाली उमेदवारांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा व उपवर-वधुंना भावी आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष, डॉ.अशोक मेनकुदळे, उपाध्यक्ष डॉ. जयेश हातंगावकर, सचिव निलेश शेटे, कोषाध्यक्ष गिरीश गाढवे, सहसचिव विनोद नारिंगे, तसेच कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ. किशोर मांडगावकर,निर्मल ठोबंरे,सारंग गाढवे, बाळासाहेब दिवे,सुरेश शेटे,अभय देमापुरे, ईत्यादी समाज बांधव उपस्थीत होते

Copyright ©