यवतमाळ सामाजिक

गोदावरी अर्बन यवतमाळ शाखेचा ६ वर्धापनदिन

 

वृद्धाश्रमास खुर्ची व बाकडे देऊन जपली सामाजिक बांधिलकी

गोदावरी अर्बनच्या यवतमाळ दत्तचौक शाखेच्या ६ व्या वर्धापनदिनी मातोश्री वृद्धाश्रम निळोणा येथे सर्वांकरिता खुर्ची व बसण्याचे सिमेंट बाकडे , शहरात विविध ठिकाणी वृक्ष संवर्धनार्थ ट्री गार्ड देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

याप्रसंगी दत्त चौक शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक रवी इंगळे ,मेन लाईन शाखा व्यवस्थापक अमित पिंपळकर, उप शाखा व्यवस्थापक अनिकेत मोहदरे, सहाय्यक व्यवस्थापक अमित निकम, अधिकारी आकाश चोले, सहाय्यक अधिकारी सागर शिंदे ,सौरभ काळे ,स्वप्नील झलपे निखिल टोने ,शितल कदम आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते.

गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील व अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या नियोजनाखाली आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने यवतमाळ दत्त चौक शाखेच्या ३०० कोटी पेक्षा अधिक ठेवी असून ही शाखा सातत्याने विक्रमादित्य व सेंच्युरीयन हा सर्वाधिक प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित केली जात आहे.

गोदावरी अर्बन वित्तीय संस्था असून देखील कायम सामाजिक बांधिलकी जपण्यात सदैव अग्रेसर असते.संस्था महाराष्ट्र,आंध्रप्रदेश,तेलंगाणा,कर्नाटक व गुजरात या पाचही राज्यात विवध सामाजिक उपक्रम राबवित असतात.त्यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर,नेत्र तपासणी,वृक्षारोपण,पाणी टंचाई भागात उन्हाळ्यात पाणी टँकर वाटप,स्वच्छता अभियान, कोरोना काळात मास्क व सॅनिटायझर,गोदावरी व नदी स्वच्छता अभियान,सार्वजनिक ठिकाणी बसण्याचे बाकडे,वाहतूक नियंत्रणासाठी बॅरिकेटस,गरजूंना अन्नदान आदी सामाजिक उपक्रमातून आपले वेगळेपण जपत असते.

या प्रसंगी वरिष्ठ शाखा व्यवस्थापक रवी इंगळे यांनी हे यश शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे असून यापुढेही आम्ही सर्व कर्मचारी आणि दैनंदिन अभिकर्ता यांच्या माध्यमातून असेच काम निष्टेने आणि सेवाभाव ठेऊन ग्राहकांची सेवा करू असे नम्रतापूर्वक नमूद केले
या वर्धापन दिनानिमित्त सर्व ग्राहकांनी विश्वास ठेऊन आम्हाला त्यांची सेवा करायची संधी दिल्याबद्दल धनंजय तांबेकर यांनी सर्व ग्राहकांचे आभार व्यक्त केले तसेच यापुढील काळात देखील नवनवीन तंत्रज्ञानासोबतच काळाची पाऊले ओळखून विविध योजना राबवून गोदावरी अर्बन ग्राहकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देईल असा विश्वास अध्यक्ष राजश्री पाटील यांनी व्यक्त केला .

Copyright ©