यवतमाळ सामाजिक

पोलीस उपनिरीक्षक विनोद तिवारी राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित

 

विशेष कामगिरी मुळे महामार्ग पोलीस अधीक्षकाच्या हस्ते पदक बहाल करून तिवारी यांचा सत्कार

 

केळापुर तालुक्यातील करंजी येथे महामार्ग पोलीस मदत केंद्र चौकीवर कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक विनोद तिवारी यांना 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिनाच्या शुभ पर्वावर

नागपूर येथील महामार्ग पोलीस अधिक्षिका मा.श्वेता खेडकर यांचे हस्ते राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले.

पो.उप.नी.विनोद तिवारी यांनी यवतमाळ व चंद्रपुर जिल्ह्यासह राज्यभर नक्षलविरोधी पथकात केलेल्या विशेष कामगिरीबद्धल त्यांना स्वतंत्र दिनी राष्ट्रपती पोलीस पदक बहाल करण्यात आले.तिवारी यांनी नक्षलविरोधी पथकात जवळपास 20 वर्ष कामगिरी केली आहे.यात गडचिरोली,चंद्रपूर,नागपूर, इटारसी,रायपुर,वर्धा आदी नक्षलग्रस्त भागात काम करतांना अनेक नक्षलवादयांवर कायदेशीर कारवाई केली आहे.

तिवारी हे सण 2019 पासून  महामार्ग पोलीस मदत केंद्र करंजी येथे चौकीवर आपले कर्तव्य बजावत आहे.करंजी येथे ही दैनंदिन कामा व्यतिरिक्त त्यांनी जनजागृतीचे कामे मोठया प्रमाणात केली.रस्ता सुरक्षेसह नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचेही काम ही ते नियमित करत आहे.त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्धल त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.अनेक कर्मचारी त्यांच्यापासून प्रेरणा घेवुन आज विशेष कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहे.

हा कार्यक्रम मुंबई येथील अप्पर पोलीस महा संचालक डॉ. भुषण कुमार उपाध्याय यांचे मार्गदर्शनाखाली करंजी येथे पार पडला.यावेळी नागपूर येथील महामार्ग पोलीस अधीक्षिका श्वेता खेडकर,प्रभारी वाहतूक पोलीस निरीक्षक संदीप मुपडे,पो.उप.नी.महेंद्र कांबळे, आदी महामार्ग वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 

(बॉक्स) पो.उप.नी.विनोद तिवारी यापूर्वी अनेक पुरस्काराने सन्मानित

पोलीस दलात विशेष कामगिरी करणाऱ्यास प्रथम राष्ट्रपती पदक दिल्या जाते.तिवारी यांची कामगिरी पाहून सण 2015 मध्ये सुद्धा त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले होते.इतकेच नाही तर त्यांना 600 च्या वर लहान मोठे शौर्य पुरस्कार सुद्धा मिळाले आहे.तसेच स्वतंत्र दिनाच्या शुभ पर्वावर त्यांना सण 2021 चा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित केल्याने त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.ते आपले श्रेय वरीष्ठ अधिकाऱ्यांना देत आहे.

Copyright ©