यवतमाळ सामाजिक

ग्रामीण भागात डेंगू चा आजार वाढला. आरोग्य यंत्रणा ने लक्ष देण्याची गरज-डॉ विनोद गंभीरे

 

मागील काही दिवसापासून आर्णी आणि आजूबाजूच्या खेड्यात डेंग्यू या आजाराने चांगलाच थैमान घातला आहे गावोगावी घरोघरी डेंग्यूचे रुग्ण दिसून येत आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने गल्लोगल्ली नाल्या सफाई,कचऱ्याचे ढीग साफ करणे तसेच डेंग्यू प्रतिबंधात्मक फॉगिंग मशीन फिरवण्याची नितांत गरज आहे.
आज आर्णीतील ग्रामीण रुग्णालय व काही खाजगी रुग्णालयात रुग्णसंख्या मावत नसल्याचे दिसत आहे यात लहान मुलांचा जास्त समावेश दिसत आहे त्यामुळे नाल्यांची साफसफाई करणे व त्वरित या घाणीची विल्हेवाट लावणे हे काम ग्रामपंचायतीने करणे व आरोग्य अधिकाऱ्यांनीही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे दिवसेंदिवस सांडपाणी साचल्याने व कचऱ्याची साठवणूक झाल्याने डासांची संख्या वाढत आहे व या डासांमुळे डेंगूने थैमान घातलेला दिसत आहे त्यामुळे त्वरित उपाययोजना करा अशी मागणी जनतेतून होत आहे.

वेळेवर दक्षता घेणे गरजेचे.

पावसाळ्यात सांड पाण्यामुळे डासांची संख्येमध्ये वाढ होते एडिसन इजिप्ती मादी डासांच्या चावल्या मुळे डेंग्यू होतो त्या करिता आपल्या आजूबाजू च्या परिसरात सांड पाणी साचू देऊ नये , नाल्या मध्ये अँटी लार्वा ची फवारणी करावी, दिवसा शक्य तो फुल बाह्यांचे कपडे घालावे व सहसा घरी पाण्या चा साठा असलेले भांडे व ड्रम झाकून ठेवावे त्या मुळे या आजारापासून बचाव होऊ शकेल व ताप येणे,डोके दुखणे,अंग दुखणे,मळमळ होणे,हिवताप येणे यासारखे लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेऊन औषध घ्यावे.
डॉ,विनोद गंभीरे.

Copyright ©