यवतमाळ सामाजिक

घाटंजीत वंचित बहुजन आघाडी कडून वृक्षारोपण करून वृक्षबंधनाचा उपक्रम

————————————————-
घाटंजी- इंग्रजाच्या गुलामगिरीतून विरजवानांनी बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आनंदात जिवन जगत असताना कोरोना नावाच्या महामारीने अख्खा देश संकटात सापडला आहे. यातून मुक्त होण्यासाठी कोरोना या आजारापासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी निसर्गाची साथ गरजेचे समजून घाटंजी येथे वंचित बहुजन युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेवून वृक्षारोपण करून वृक्षबंधन करण्याचा उपक्रम १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हाती घेण्यात आला.
स्वातंत्र्य हा जसा जिव्हाळ्याचा विषय आहे. हाच विषय कोरोना पासून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य आणि त्यासाठी निसर्गाची साथ हवी म्हणून निसर्गासोबत हा शुभ दिवस साजरा करण्याची संधी समजून ध्वजारोहण होताच घाटंजी पोलीस स्टेशन मध्ये वृक्षारोपण करून वृक्षबंधन कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून पर्यावरणाचे महत्त्व भावी पिढीला पटवून देता येईल असा आयोजकांचे मनोगत आहे. शहरातील अंबानगरी, नेहरू नगर, पोलीस स्टेशन येथे हा उपक्रम राबविले. या प्रसंगी पोलीस निरीक्षक बबनराव कराळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिडाम, सुनिल केवट, वामन जाधव, शेख जुनेद, संदीप गोहणे, शेख आसिफ, संजय चव्हाण, वाकोडे, देवानंद बनसोड यांचे सह वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संघपाल कांबळे, दिनेश अक्कलवार (परिश्रम कोचिंग क्लासेस), भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष संजय कांबळे, शिव जिमचे विक्की मानकर, दीक्षांत वासनिक, साहिल रामटेके, गौरव शेंडे, शुभम महाजन, आदेश कुंटलवार, शंतनु वानखडे, शुभम नगराळे यांनी प्रामुख्याने सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमाचे आयोजन सिद्धांत जिवने, आदेश कुंटलवार यांनी केले होते असे संघापल कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकातून कळविले आहे.

Copyright ©