यवतमाळ सामाजिक

अजय दिगंबर थोटे उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी म्हणून सन्मानित

——————————————–

लाडखेड- वीजवितरण कंपनी तर्फे दरवर्षी वीजवितरण विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा १ मे कामगार दिनी सन्मान केल्या जाते. मात्र यावर्षी हा सन्मान स्वातंत्र्य दिनी आयोजित करण्यात आला होता. यात नेर उपविभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत असणारे अजय दिगंबर थोटे यांनी उत्कृष्ट कार्य केल्याची पावती म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने जाहीर केलेल्या पुरस्कार योजने अंतर्गत नेमून दिलेल्या कामानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील विद्युत वाहिनीची देखभाल करणे, अचानक उदभवणाऱ्या तांत्रिक स्वरूपाच्या समस्येचे तातडीने निराकरण करणे, त्याद्वारे विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देणे ही सेवा बजावून कार्यत्परता, कर्तव्यदक्षता, निष्ठा, समप्रित्वृती यासाऱ्यासार बाबीचा वरिष्ठ स्तरावरून दखल घेऊन अजय दिगंबर थोटे यांची सन २०२०- २०२१ करीता उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी म्हणून निवड करून त्यांचा स्वातंत्र्य दिनी सन्मान करण्यात आला. थोटे हे सध्या लाडखेड विज वितरण केंद्रात कार्यरत असून त्यांचे कडे पाच गावाची जबाबदारी सोपविली आहे. ते सतत आपल्या कार्याप्रती ओढ ठेवून कार्यरत असतात. त्यांना मिळालेला सन्मान त्यांनी केलेल्या कार्याची पावती समजली जात आहे. नुकतेच त्यांना अमरावती परीमंडळाचे मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांच्या सहीचे सन्मान प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह यवतमाळ विभागीय अभियंता सुरेश मडावी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यांच्या या सन्मानाचे श्रेय मालखेड सबटेशन चे सहाय्यक अभियंता संजय कळसकर व लाडखेड सब स्टेशन चे सहाय्यक अभियंता आशीर्वाद डांगे यांना देत असून प्रभाकर माहूरे ,सुरज ढोके , अविनाश वाकेकर अमोल राऊत , नंदकिशोर ढवळे , राहुल देऊळगावकर, अश्विन जाधव, नागर्जून गणवीर, गजानन चव्हाण,उमेश निमकर ,सचिन विश्वे, चितेश चौधरी, संतोष पानतावणे, सत्तार खान, रमेश शाहू गजानन देवकते यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. याच सोबत लाडखेड परिसरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Copyright ©