यवतमाळ सामाजिक

हिवरी येथे शेतकरी व शेतमजूर यांची आरोग्य तपासणी शिबिर

 

कृषी विभाग व रिलायन्स फॉउंडेशन मार्फत हिवरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य करण्यात आली .फवारणी मुळे शेतकरी व शेतमजूर यांनी फवारणी करताना विषबाधा होऊ नये याबाबत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन कृषी सहाय्यक कु.एम. डी. बाळसराफ यांनी तालुका कृषी अधिकारी यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली केले .फवारणी करताना संरक्षित किटचा वापर करण्याबाबत सखोल असे मार्गदर्शन श्री. कृषी पर्यवेक्षक ए.बी .दिवे यांनी केले फवारणी करणाऱ्या शेतकरी व शेतमजूर यांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन या शिबिरामध्ये करण्यात आले .तसेच सिजेंटा इंडिया लिमिटेडचे जिल्हा समन्वयक आशिष मोघे तसेच तलुक्या समन्वयक् गनेश् आत्रम् यांनी फवारणी किट उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकरी व शेतमजुरांना पंचायत समितीचे सदस्य सुनीता ताई मडावी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले .तसेच डॉक्टर नफते, डॉक्टर चौधरी, डॉक्टर फुपरे यांनी शेतकरी व शेतमजुरांच्या आरोग्य तपासणी करून त्यांचे मार्फत वैद्यकीय सल्ला देण्यात आला. सदर शिबिराचा लाभ हिवरी, वाटखेड, चांदापूर ,उमरठ आधी गावातील शेतकरी व शेतमजूर यांनी लाभ घेतला. सदर शिबिर करिता कृषी सहाय्यक बि.डी .चांदेकर यु. व्ही.मोहुरले सुरेंद्र होन वडस्कर एम.डी .बाळसराफ रिलायन्स फाऊंडेशनच्या किरण येरमे तसेच आरोग्यसेवक दवे हे उपस्थित होते.

Copyright ©