यवतमाळ सामाजिक

पांढुर्णा (आदर्श) च्या सरपंचाने सामाजिक दायित्व जोपासत केले अनेक साहित्यांचे वाटप

——————————————–
यवतमाळ- जिल्ह्यातील सर्वांच्या तोंडावर असणारे पांढुर्णा (आदर्श) ग्राम पंचायत सध्या उच्च शिक्षित सरपंच रत्नदीप पवार यांच्या नव नवीन संकल्पनेमुळे नावाप्रमाणेच गाव आदर्श ठरत असून 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळा व आरोग्य विभागास उपयोगात येणाऱ्या विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील शाळा दर्जेदार व्हाव्यात, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे. हा दृष्टीकोन पुढे करून उच्च शिक्षित सरपंच रत्नदीप पवार यांनी स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व वसराम पाटील विद्यालय आणि बोधगव्हाण येथिल प्राथमिक शाळेला ब्लूटूथ माईक व म्युझिक स्पिकर तसेच परिसरातील विद्यार्थ्यातील कोरोना सह ईतर आजाराचे निदान तातडीने व्हावे हा मानस पुढे करून थर्मलगन व पल्स ऑक्सीमिटर ग्राम पंचायत तर्फे भेट दिली. एवढेच नव्हे तर गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असताना सुध्दा छोट्या मोठ्या तपासणीसाठी गावातील रुग्णांना शहराच्या ठिकाणी जावे लागते. ही बाब हेरून बी. पी. ऑपरेटर मशिन, शुगर तपासणी यंत्र, हिमोग्लोबिन तपासणी मशिन, वजन मापक, थर्मलगण, पल्स ऑक्सीमिटर, वाफारा मशिन, कपाट, टेबल खुर्च्या अश्या साहित्यांची ग्राम पंचायतच्या माध्यमातून पांढुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन एक आदर्श निर्माण केला. ईतर कामांना प्रथम प्राधान्य न देता काळाची गरज ओळखून शाळा व आरोग्य विभागास जे साहित्य भेट दिल्या ते नक्कीच जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडणार असल्याने त्यांच्या संकल्पनेचा सर्वत्र स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
याबाबत सरपंच रत्नदीप पवार यांना विचारले असता आपल्या गावातील रुग्णांना बी. पि., मधुमेह, हिमोग्लोबिन, ताप, ऑक्सीजन लेवल, वजन संतुलन सोबतच लहान बाळांना वाफारा यासारख्या बाबी इथेच उपलब्ध व्हाव्यात हा दृष्टीकोन पुढे ठेवून हे कार्य आपण ग्राम पंचायतिच्या माध्यमातून केले आहे. आपण दिलेल्या भेट साहित्याचा योग्य वापर आरोग्य विभाग करतील अशी आशा आपण बाळगली असून यापुढेही मी आणि ग्राम पंचायत आरोग्य व शिक्षण याबाबिकडे जास्तीत जास्त लक्ष देवून जेवढे आमच्याने शक्य होईल ती मदत करीत राहणार आहे. असे त्यांनी सांगितले.

Copyright ©