यवतमाळ सामाजिक

बारी समाज संघटना वणी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष पदी गणेश धानोरकर यांची निवड.

 

बारी समाज संघटना वणी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पदी गणेश धानोरकर तर उपाध्यक्ष पदी निलेश विठ्ठलराव होले,प्रविण वामनराव सावलकर,तर सचिव पदी राम नारायण मुडे व सहसचिव पदी अमोल मारोतराव धानोरकर,कोषाध्यक्ष पदी विजय सुभाषराव राऊत यांची निवड करण्यात आली, अध्यक्ष पदी गणेश धानोरकर यांची दि,7 एप्रिल 2021 रोजी वणी विधानसभा क्षेत्रातील बारी समाज बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. त्यासंदर्भातील अधिकृत नियुक्ती पत्र दि. 7 आँगस्ट 2021 ला देऊन सम्मानित करण्यात आले.

वणी विधानसभा क्षेत्रातील समाजाच्या सामाजीक,आर्थिक,शैक्षणिक हक्कासाठी एक अग्रणी सैनानी म्हणून आपनास लढायचे नेतृत्व करायचे असून ही महत्वाची जवाबदारी बारी समाज नागपूर संघटनेचे पुस्तक प्रकाशक अध्यक्ष हेमंत साने यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांना वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व बारी समाजाच्या सर्वागिन उन्नतीसाठी आपले योगदान लाभावे ह्या हेतूने निवड झाली आहे,यांच्या निवडीमुळे बारी समाज संघटनेच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला असून गणेश धानोरकर यांच्या सह संपुर्ण कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Copyright ©