यवतमाळ सामाजिक

टिटवी व वासरी येथे महाराजस्व अंतर्गत जातप्रमाणपत्र व रेशन कार्ड चे वाटप

——————————————–
घाटंजी-: तालुक्यातील टिटवी व वासरी येथिल आदिम जमातीतील कोलाम समाजाच्या लोकांना महाराजस्व अंतर्गत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा केळापूर् उपविभागीय अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते त्यांच्या राहत्या घरी जाऊन जात प्रमाणपत्र व रेशन कार्डच्या दुय्यम प्रतीचे मोफत वाटप करण्यात आले.
आदिम जमात म्हणून ओळख असलेल्या कोलाम समाजातील काही बांधव आजही अज्ञानामुळे मागास प्रवर्गात वावरत असून कोणतेही प्रमाणपत्र घेण्यासाठी तालुका स्तरावर जावून ते मिळविणे त्यांच्या आर्थिक बाबीला परवडणारे नाही. त्यामुळे ते अनेक योजने पासून वंचित राहत आहे. हिच बाब हेरून व त्यांच्या अज्ञानाचा व आर्थिक परिस्थितीचा विचार करून घाटंजी तहसिल कार्यालयामार्फत अशा नागरिकांना घरपोच प्रमाणपत्र देण्याचे ठरवून दिनांक १३ ऑगस्ट रोजी टिटवी व वासरी या गावात जाऊन त्यांना जात प्रमाणपत्र व रेशन कार्ड चे वाटप केले. या वाटप कार्यक्रमात तहसिलदार पुजा माटोडे, निवासी नायब तहसिलदार डी. एम. राठोड, महसूल नायब तहसिलदार माला गेडाम, पुरवठा निरिक्षक योगिता वाघ यांनी सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वी केला. या उपक्रमामुळे टिटवी व वासरी येथिल जनतेत महसूल विभागाने राबविलेल्या उपक्रमाबाबतीत समाधान व्यक्त केल्या जात आहे.

Copyright ©