Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात दोन पॉझिटिव्ह ; एक कोरोनामुक्त

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात २१६१ बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 13 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे तसेच एक जण कोरोनामुक्त झाल्याने सध्या एकूण ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात सहा व बाहेरजिल्ह्यात दोन अशी एकूण आठ आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1281 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने सर्व 1279 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72822 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71027 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये दारव्हा व दिग्रस येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेष आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष सात हजार 725 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 34 हजार 492 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.29 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.16 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2161 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 13 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2161 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 13 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 774 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

______________________________________

पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा

 

यवतमाळ दि. 13 ऑगस्ट : राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे 14 व 15 ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दिनांक 14 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 7 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

रविवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वाजता ए.पी.जे. अब्दुल कलाम गुटखा मुक्त समाज अभियान शुभारंभ कार्यक्रमास नियोजन भवन येथे उपस्थिती. सकाळी 10.30 वाजता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे आयोजित रान-भाजी महोत्सवाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतामाळ येथील ह्युमन मिल्क बँक चे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता जाम पार्क, यवतमाळ येथील वृक्ष लागवड कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वाजता जिल्हा परिषद यवतमाळ येथे ॲम्ब्युलन्स वाहनाचे लोकार्पण व मिशन कायाकल्प शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथून औरंगाबादकडे प्रयाण.

Copyright ©