यवतमाळ सामाजिक

फवारणी करणार्या शेतकरी.शेतमजुर यांची आरोग्य तपासणी.

 

कृषी विभाग व सिजेंटा इंडिया लिमिटेड तसेच प्रा.आ.केंद्र बेलोरा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी व शेतमजूर यांना फवारणी करताना विषबाधा होऊ नये याबाबत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन कृषी सहाय्यक कु.एस.व्हि.येसनकार यांनी केले फवारणी करताना संरक्षीत फवारणी किटचा वापर करण्याबाबत सखोल असे मार्गदर्शन कु.एक.पी.दिवे यांनी केले.डाॅ.दूधे वै.अ.यांनी फवारणी करणार्या शेतकरी व शेतमजूर यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेताना कूठल्या उपाययोजना करायला पाहिजे या विषयी मार्गदर्शन केले.यावेळी पं .सं सभापती ‌.सौ.कांताताई संजय कांबळे यांच्या हस्ते संरक्षित चार किटचे वाटप करण्यात आले.तसेच संजयभाऊ कांबळे यांनी शेतकरी व शेतमजूर यांना फवारणी करताना आरोग्याची काळजी घेण्यासाठी आव्हान केले तर या वेळी डाॅ.कू.पूजा भगत यांनी शिबिरात येणाऱ्यांची रक्त तपासणी केली. यावेळी संगिताताई पिसे,संजय कांबळे उपस्थित होते

Copyright ©