यवतमाळ सामाजिक

“बीजप्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन”…!

 

मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय, यवतमाळ येथील विद्यार्थिनी कु. कोमल सुरेश मेश्राम हिने ग्रामीण व कृषी कार्यक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत चौधरा गाव बरबडा येथे बीज प्रक्रिया बद्दल जाणीव जागृती कार्यक्रम घेतला.
या कार्यक्रमात बिजप्रक्रियेचे तसेच बिज प्रक्रिया केल्याने उगवण शक्ती वाढण्यास मदत होते. रोगकारक बुरशीचा नायनाट होतो. पिकांच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण होते, प्रत्येक वर्षी पेरणीपूर्वी प्रत्येक बियाणांची बिज प्रक्रिया करने अत्यंत आवश्यक असते,असे संपूर्ण फायदे तसेच बिज प्रक्रीया कशी करावी याबाबत संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.ए.ठाकरे सर, उपप्राचार्य.मंगेश कडू सर, (कार्यक्रम अधिकारी) शुभम सरप सर, विषय तज्ञ डॉ.प्रतीक बोबडे सर, के.टी.ठाकरे सर, ए.ए डोंगरवार सर यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमास गावातील शेतकरी राजू राऊत, प्यारेलाल पातालबंशी, अंकुश देसाई व ग्रामपंचायत सदस्य मा. वाघुजी लडके उपस्थित होते..

Copyright ©