Breaking News यवतमाळ सामाजिक

गो हत्या करून घरीच मास विक्रीचा गोरखधंदा

———————————————
याला पायबंद घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार
——————————————–
यवतमाळ गोवंश हत्या व गो तस्करी करण्यासाठी शासनाने बंदी घातली आहे. मात्र या बंदीला न जुमानता घाटंजी येथिल घाटी स्थित गुरुदेव वार्ड वरील पत्रकाराच्या नावावर मिरवणारे कज्जुम कुरेशी व त्यांचे वडिल करीम कुरेशी भाऊ तनवीर व जमीर स्वतःच्या घरी गोहत्या करून त्याचे मास खुलेआम विक्री करीत असल्याबाबत ची तक्रार त्यांचे घराशेजारी राहणारे असलम कुरेशी यांनी वरिष्ठ अधिकारी यांचे कडे लेखी निवेदन देवून या प्रकाराला पायबंद घालून संबधितावर कारवाई ची मागणी केली आहे.
गोहत्या करणे कायद्याने गुन्हा असला तरी ते याबाबिला न जुमानता पत्रकारिता पुढे करून गो मास विक्रीचा व्यवसाय चालवीत आहे. ते वास्तव्यास असलेल्या घरात गोहत्या करीत त्यातील बिनकामी मास अस्ताव्यस्त फेकून देतात त्यामुळे त्याची दुर्गंधी पूर्ण परिसरात पसरून येथील रहिवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर त्यातील काही भाग फेकल्यामुळे ते सडल्या नंतर त्यावरील माश्या परिसातील घरातील अन्नावर बसत असल्याने रोगराई पसरण्याची भिती बळावली आहे. यावर परीसतील नागरिकांनी सांगितले तर त्यांनाच दम देवून चाकू, तलवार काढतात. असाच प्रकार असलम कुरेशी यांचे सोबत घडला असून त्यांनी हटकले असता चाकू तलवार घेवून मारावयास आले. व जिवे मारून टाकण्याची ताकीद दिली. घाबरलेल्या असलम कुरेशी यांनी या प्रकाराबद्दल दिनांक २७ जुलै २०२१ ला घाटंजी पोलिस स्टेशन गाठून त्यांचे विरोधात तक्रार दिली. परंतु पोलिस कर्मचाऱ्यांनी या प्रकाराला गंभीरतेने न घेता आपसी समझोता घडवून आणला व प्रकरण तिथेच थांबविले. अशी तक्रारकर्ते दैनिक नवभारत चे तालुका प्रतिनिधी असलम कुरेशी यांचे म्हणणे आहे. मात्र हे गोहत्या करून मास विक्री करणाऱ्यांचा हा व्यवसाय सुरूच आहे. आणि अरेराविने वागणे सुरूच असल्याने अखेर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसिलदार यांचे सह पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देवून या प्रकाराला पायबंद घालावा आणि अश्या क्रूर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी. आणि परीसातिल नागरिकांना आरोग्याच्या भितीमुक्त करावे तसेच गोहत्या थांबवावी अशी मागणी असलम कुरेशी यांनी केली आहे.

Copyright ©