महाराष्ट्र सामाजिक

चिपळूण शहर येथे पूरग्रस्तांना सेवाभावी संस्थांकडून भरगोस मदत

 

गवळी सेवा फाऊंडेशन ठाणे शहराध्यक्ष, व एकदंत प्रतिष्ठाचे अध्यक्ष निलेश नारायण किलजे यांच्या नेतृत्वात चिपळूण येथील पूरग्रस्त कुटुंबांना मदत

गवळी सेवा फाऊंडेशन महाराष्ट्र, एकदंत प्रतिष्ठान हाजुरी दर्गा ठाणे, श्रीकृष्ण प्रतिष्ठान मुंबई, या सेवाभावी संस्थांनी एकत्र येत चिपळूण तालुक्यातील काही पूरग्रस्त गावांत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, यात प्रामुख्याने खेर्डी, भुरणवाडी, चिलेवाडी, मुरादपुर, चिपळूण बाजारपेठ, तसेच कोंढे, पेढे या गावांचा समावेश आहे.
मानवाने निसर्गाने केलेले अतिक्रमण कदाचित त्याचाच प्रतिकार म्हणून हे संकट आपणास भोगावे लागले. त्याचा सर्वात मोठा फटका कोकणाला बसला. यात प्रामुख्याने महाड, चिपळूण, खेड, या ठिकाणी मोठी हानी झाली. यामध्ये कित्यकांचे संसार स्वतःच्या डोळ्यासमोर होत्याचे नव्हते झाले. आपलीच माणसं नजरेसमोरून नाहीसी होत होती आणि हे केविलवाण्या डोळ्यांनी बघत बसण्याशिवाय दुसरा पर्याय कोकणवासीयांकडे उरला नव्हता. झालेले नुकसान हे कधीच भरून येणारे नाही परंतु आपल्याच माणसांचा संसार पुन्हा उभा करण्याकरिता त्यांना धीर देण्याचा प्रयत्न या सेवाभावी संस्थांनी एकत्र येत केला आणि तमाम जनतेला मदतीसाठी आव्हान केले आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातुन भरभरून प्रतिसाद मिळाला. मोठया प्रमाणात घरगुती उपयोगी वस्तू, कपडे, धान्य, जेवणाची सामग्री, पाणी व आर्थिक मदत मोठया प्रमाणात जमा झाली.
मिळालेली मदत योग्य त्या ठिकाणी प्रत्यक्षात घरोघरी जाऊन पाहणी करून खरोखर ज्यांना गरज आहे अशा लोकांपर्यंत पोहचेल याची खबरदारी घेण्यात आली. या कठीण प्रसंगातून सावरण्याची ताकद भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाला देवो हीच प्रार्थना.
कोकणी माणसाने कधी कोणापुढे हात पसरले नाही, हेही दिवस जातील, कोकणी माणूस हा नेहमी जिद्दीने लढणारा आहे हे आम्ही पाहिले. आमच्या हितचिंतक मित्र परिवारांनी आमच्या हाकेला साद देत आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याच जोरावर आज आम्ही प्रत्येक्षरीत्या घरोघरी जाऊन मदत नव्हे तर आमचं कर्तव्य निभवू शकलो. अशा आमच्या प्रत्येक देणगीदारांचे आम्ही आभारी आहोत असे बोल यावेळी गवळी सेवा फाऊंडेशनचे ठाणे शहराध्यक्ष, व एकदंत प्रतिष्टान चे अध्यक्ष निलेश नारायण किलजे यांनी व्यक्त केले.
या कामात प्रामुख्याने मेहनत घेतली असे आम्हचे गवळी समाजाचे समाजसेवक मंगेश वासुदेव किलजे, गवळी सेवा फाऊंडेशन चे नवी मुंबई शहराध्यक्ष राहुल अंकुश घोले, तसेच ज्यांनी हे सर्व करण्यासाठी खूप कष्ट व काळजी घेतली असे आमचे एकदंत प्रतिष्ठानचे पदाधिकारी, स्वयंसेवक व सभासद यांनी रात्रीचादिवस करून हे काम पूर्ण केलं, खरचं एकदंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष व त्यांच्या टीमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. एकदंत प्रतिष्टानच्या सर्व स्वयंसेवक, यांचे गवळी सेवा फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने आम्ही आभार मानतो. आपली साथ यापुढेही आम्हाला लाभेल अशी आम्ही आशा बाळगतो आणि भगवान श्रीकृष्ण या संकटातून आम्हा सर्वांना मुक्त करो अशी मनस्वी प्रार्थना करतो.

Copyright ©