Breaking News यवतमाळ सामाजिक

पत्रकारास धमकी देणार्‍या रेशन तस्करावर कारवाई करा

दिग्रस पत्रकारांचे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन,

दैनिक वृत्तपत्राचे उपसंपादक सुरेंद्र राऊत यांना स्वस्त धान्य दुकानातील रेशन तस्करी बाबत वृत्त प्रकाशित केले असता रेशन तस्कर शेख रहीम शेख करीम यांनी राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिली सदर घटनेचा दिग्रस तालुक्यातील पत्रकाराने निषेध नोंदवून रेती तस्करा विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशा आशयाची तक्रार तहसीलदार राजेश वजीरे यांचेमार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे केली आहे
तसेच दिग्रस दिग्रस तालुक्यात सुद्धा शहरासह ग्रामीण भागात रेशन धान्य तस्करांकडून तस्करी जोमात सुरू आहे दिग्रस ते आरणी या जास्ती मार्गावर लगत असलेल्या गोडाउन मध्ये हजारो टन गहू तांदूळ साठविला जात आहे सदर होत असलेल्या तस्करीची जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी वेळीच दखल घेणे गरजेचे झाले आहे घडलेल्या प्रकाराचे पुनरावृत्ती होऊ नये त्याकरिता दिग्रस तालुक्यातील रेशन तस्करा वर त्वरित कारवाई करण्याची मागणी सुद्धा दिलेल्या निवेदनातून केली आहे,
निवेदन देताना पत्रकार लूकमान खान, पुरुषोत्तम कुडवे,विलास निकम, लक्ष्मण टेकाळे, साजिद पतलेवाले, प्रकाश सातघरे, सुनील हिरास, प्रफुल व्यवहारे ,अजित महिंद्र,सदानंद जाधव, जितेश बुरकुंडे, राम राठोड, पंकज चव्हाण ,कपिल इंगोले व तालुक्यातील पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते

Copyright ©