यवतमाळ सामाजिक

गरजवंतांनी मोफत शिवभोज थाळी चा आवश्य लाभ घ्यावा _ मा.आमदार ख्वाजा बेग

 

 

राज्यातील गोरगरीब जनता भूकमारीची बळी पडू नये यासाठी गेल्या विधानसभा निवडणूकीत आपल्या जाहीरनाम्यात “५ रुपयात शिवभोजन थाळी देऊ” असे अभिवाचन केले होते; त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात गठबंधन होऊन महा विकास आघाडीचे सरकार स्थापन होताच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले अभिवाचन पूर्ण केले व संपूर्ण महाराष्ट्रात शिव भोजन थाळी गोरगरिबांसाठी उपलब्ध करून दिली. त्यामुळे गरजू लोकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन माजी आमदार ख्वाजा बेग यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या लोक कल्याणकारी उपक्रम अंतर्गत आयोजित येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आर्णी येथे 12 ऑगस्ट रोजी शिव भोजन थाळी केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र उत्तमराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष कांतीलालजी कोठारी, राष्ट्रवादीचे गटनेता चिराग शहा, नगर सुधार समितीचे सचिव राहुल ढोरे, मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन यलगंधेवार, शिवसेना शहर प्रमुख पंकज शिवरामवार उपसभापती नुनेश्वर आडे, संचालक गफुर शहा आणि उमेश ठाकरे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. ख्वाजा बेग पुढे म्हणाले की देशात कोरोनाणाचीदुसरी लाट सुरु आहे, यामध्ये जवळचे लोक आपल्यातून निघून गेले त्यामुळे जीवनात येणारे उपक्रम राबवून सुखरूप रहावे कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याने शासनाने 14 सप्टेंबर पर्यंत 150 लोकांसाठी मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दररोज गरजवंतानी याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन कुणाल मनवर तर आभार राजेंद्र शिवरामवार यांनी केले. शिवभोजन केंद्राला माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांनी सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमाला गणेश चिल्लरवार ,कचरूलाल दुगड सय्यद अक्रम, हारुण पेंटर, संजय व्यवहारे,अशोक वाकोडे, नाना सूर्यकार सर, संजय उपलेंचवार,संदीप बुटले,गणेश वानखडे दुर्गासिंग रत्ने, नंदू लाड ,सय्यद फायाज, इम्रान फाजलानी, राजू इंगोले, इत्यादी मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमासाठी शिवभोजन थाळी केंद्राचे संचालक योगेश्वर शिवरामवार यांनी अथक परिश्रम घेतले.

Copyright ©