यवतमाळ राजकीय

काँग्रेसच्या जम्बो महारक्तदान शिबीरास जितेंद्र मोघेंच्या नेतृत्वात मिळतोय उत्तम प्रतिसाद

यवतमाळ- दि.११/८/२१ रोजी जवळा येथे जितेंद्रभाऊ मोघे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कमिटी द्वारा कारगिल विजय दिवस ते भारतीय स्वतंत्रता दिवस महारक्तदान शिबिरातील शिबीर क्र. ११ आयोजन करण्यात आले. या शिबीरात नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या महारक्तदान शिबीरात जवळा-लोणी सर्कलच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी एकूण २४२ लोकांनी रक्तदान केले. विजयभाऊ मोघे यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली सदर महारक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
कारगिल विजय दिवस( २६ जुलै) ते भारतीय स्वतंत्र दिवस महारक्तदान शिबीरे मालिकेत आजपर्यंत आर्णी मतदार संघात ११ शिबिरात एकूण १६२० रक्तदात्याने रक्तदान केले.रक्तदानाला नागरिकांना मध्ये उत्साह व भारतीय सैन्य प्रति कृतज्ञता व्यक्त होत आहे. या मालिकेत पुढे घाटंजी तालुकातील शिवणी ,घोटी, व किनही येथे १४ ऑगस्ट व आर्णी तालुक्यातील लोनबेळ येथे १५ ऑगस्ट नियोजित आहे.
जवळा येथे आर्णी-केळापूर विधानसभा मतदार संघाचे युवा नेते जितेंद्रभाऊ मोघे,जी.प.सदस्या किरणताई मोघे,विजयभाऊ मोघे,राजुभाऊ विरखडे,पंचायत समिती सभापती विलासभाऊ अगलधरे,निताताई आडे सरपंच जवळा,राजुभाऊ गावंडे,गणेश मोरे,अजित राठोड,विजय राठोड,विनोद पंचभाई,मनोज नागापुरे, तुकाराम राठोड,अनिल चौधरी, भारत मानकर,दिनेश पवार ,राहुल माळवे,कोशोर गावंडे,धीरज गावंडे,आसिफ भाई,गणेश एकंडवार,विश्वनाथ भाऊ,भारत जाधव,अनिल राठोड,रमेश कोरटकर,संतोष इंगळे,गोलू राठोड,नरेश रामटेके सर,विनोद वासाडे,आणि सर्व ग्रा.प. सदस्या- सौ.हर्षाताई चौधरी, सीमाताई चोपडे,संगीता गजानन भाडेकर, आशाताई भिसे,लताताई रामटेके,दिशा करमणकर,रुचिका एकंडवार तसेच भारत कालबांडे,प्रा.ढोकणे सर,प्रा.करमणकर सर आदी उपस्थिती होते.

 

Copyright ©