यवतमाळ सामाजिक

विश्व दिनानिमित्त आदिवासी समाजावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा विदर्भ महासचिव आरती फुपाटे

समाज माध्यमावर आदिवासी समाजावर आक्षेपार्ह विधान करणार्यवर कठोर कारवाई करण्यात यावी,अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,बिरसा क्रांती दल,बिरसा बिग्रेड, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद,सह तालुक्यातील समाज बांधवांनी दिग्रस पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले यांना निवेदन देण्यात आले.९ आगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो.त्या अनुषंगाने सर्वच आदिवासी बांधव समाज माध्यमावर सुभेच्छा देऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात . या दिवशी फेसबुक वर आनंदराव डवले रा.महागाव यांनी सुभेच्छापर पोस्ट टाकली असता तालुक्यातील तुपटाकळी येथील हारामखोर गोपाल ढोरे या समाजकंटकांने आदिवासी बांधवावर अश्लील शब्द व भडकावू पोस्ट टाकून संपूर्ण आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या.त्यामुळे तालुक्यातील सर्व आदिवासी समाज बांधव तीरव असंतोष निर्माण झाला व त्याचा सर्वत्र निषेध केला आहे.
समाज विघातक गोपाल ढोरे ने फेसबुक च्या माध्यमातून आदिवासी बांधवांची मने दुखावल्याने त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ महासचिव आरती फुपाटे, जिल्हा उपाध्यक्ष बी टी कन्नाके, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सिडाम, नगरसेवक वसंतराव मडावी,बीकेडी जिल्हा उपाध्यक्ष अनिल पेदोर, तालुकाअध्यक्ष भिमराव खारोडे, नारायण कराळे, दिलीप जवादे, एम.एम उईके, उत्तम सोळंके, विनोद नाटकर,एम आर सोळंके,भारत मेसराम, संदिप बोरकर, गजानन पवार, शाम ससाने, सगित पवार,सह शेकडो समाज बांधव उपस्थित होते
——————————————
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठाणेदार सोनाजी आम्ले यांनी तुपटाकळी येथील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या गोपाल ढोरे ला मंगळवारीच ताब्यात घेतले
—————————————-

Copyright ©