यवतमाळ सामाजिक

शिरोली येथे पाणी पुरवठा योजना टाकीचे कोनशीलेचे अनावरण..!

घाटंजी : तालुक्यातील शिरोली येथील पाणीच्या टाकीच्या कोनशीलाचे अनावरण सरपंच चंद्रकांत इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

विशेष म्हणजे पाण्याच्या टाकीची जागा सनी पाटील लोणकर यांची होती. त्यांनी शिरोली येथील ग्रामपंचायतला विना मोबदला तसेच कोणतीही अटी शर्ती न ठेवता कायदेशीर रित्या ग्रामपंचयतला दान दिल्या मुळे आज शिरोली येथील जुन्या पाणीच्या टाकी जवळ नवीन पाण्याची टाकी करीता जागा उपलब्ध झाली. त्यामुळे टाकीत पाणी भरणे व सोडणे तसेच देखभाल करणे इत्यादी सोयीचे झाले आहे.

या प्रसंगी शिरोलीचे सरपंच चंद्रकांत इंगळे पाटील यांनी लोणकर कुटूंबियांचे सदैव ऋणी राहील, असे मत व्यक्त केले.

तसेच या प्रसंगी ग्रामपंचायत चे सर्व सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती संदीप पाटील बोबडे, सुनील निबुदे, अरुण नागरकर, रवी ढाले, दत्ताजी कोरवते, बालूभाऊ सलाम, दत्ताजी मेश्राम, अमोल पेंदोर, अमोल बावणे आदीं ग्रामपंचायत सदस्य तसेच कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी सनी पाटील लोणकर यांचे सर्व गावकर्‍यांच्या उपस्थितीत आभार मानण्यात आले. तसेच पाण्याच्या टाकीला उत्कृष्ट व्हाँलीबाँल पटु स्व. अनिलराव नरसिंगराव लोणकर यांचे नांव देऊन कोनशीलाचे अनावरण करण्यात आले.

Copyright ©