Breaking News यवतमाळ सामाजिक

जोडमोहा येथिल स्मशानभुमित अंत्यविधी करण्यासाठी करावे लागते नदी पार

———————————————
मृतआत्म्या सह होताहेत नागरिकांचे हाल
———————————————
यवतमाळ-: सामाजिक दायित्वातून एकदा मानवी शरीर मृत झाला की त्याचे मोठ्या सन्मानाने अंत्यविधी कार्यक्रम पार पाडल्या जाते. अखेर त्याच्या मृत आत्म्याची कुठेही अवहेलना होणार नाही याची पुरेपूर समाज बांधवाकडून दक्षता घेतली जाते. मात्र जोडमोहा येथिल स्मशान भुमी याला अपवाद ठरत आहे. अंत्यविधी साठी मृत आत्म्यास चक्क भरलेल्या नदी पात्रातून न्यावे लागत असल्याने मृत आत्म्यास बाधा पोहचून नागरिकांना पाण्यातून मार्गक्रमण करणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जोडमोहा येथिल स्मशान भुमी नदीच्या दुसऱ्या तिरावर आहे आणि या मार्गावर पुल नसल्याने नदीत उतरून पाण्यातून जावे लागते. यात वयोवृध्द नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते बहुतांशदा पायही घसरून पाण्यात गटागल्या घेतल्याचे उदाहरण आहेत. याशिवाय मृत आत्म्यास खांद्यावर नेतांना त्या प्रेताची काय अवहेलना होत असेल आणि खांदेकरांना काय त्रास सहन करावे लागत असेल याची कल्पना करणेही योग्य राहणार नाही. यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा मागणी केली मात्र याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे वास्तव आहे. निवडणूक आली की, या पुलासाठी आश्वासनाची खैरात सोडली जाते आणि एकदाचे निवडून आले की, त्यांचे आश्वासन हवेत विरून जाते. ग्राम पंचायत निर्मिती पासून या गावाला अनेक सरपंच होवून गेले मात्र ही बाब कोणीही गंभीरतेने घेतलेली ऐकण्यात नाही. स्मशानभूमी सर्व जातीधर्मातील लोकांनसाठी वापरात येणारी आहे. मात्र येथिल नदी पात्रातून प्रवास करणे फार जिकरीचे झाले आहे. आता तर पावसाळा सुरू आहे. यात या नदीतील पाण्याचा अंदाज सुध्दा येत नसल्याने अंत्ययात्रेतील नागरिक भयभीत होताना दिसत आहे. कोणाकडेही मयत झाली की तो प्रथमतः च दुःखात असतो मात्र त्या दुखापेक्षा स्मशानभूमीत कसे न्यायचे हया विचाराने हैराण होत आहे. यात बहुतांश आप्तस्वकीय काढता पाय घेऊन अंत्ययात्रेत काही अंतरापर्यंत जावून माघारी परतले आहेत. ग्राम पंचायतीने ईतर विकास कामांना बाजूला सारून सत्ताधारी व विरोधी गटाने एकत्र येत या मार्गावरील पुलाच्या बांधकामाला प्रथम प्राधान्य द्यावे. आणि हा पुल तातडीने बांधावा व मृतआत्म्याची होणारी अवहेलना टाळावी व अंत्ययात्रेतील नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी जोडमोहा ग्रामवासियकडून जोर धरत आहे.

Copyright ©