Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात तीन पॉझिटिव्ह ; दोन कोरोनामुक्त

यवतमाळ दि. 11 ऑगस्ट : गेल्या 24 तासात जिल्ह्यात तीन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहे.

सध्या एकूण ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात सात व बाहेरजिल्ह्यात दोन अशी एकूण नऊ आहे. आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72820 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71024 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये कळंब येथील एक, यवतमाळ येथील एक व इतर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2164 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 10 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2164 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 9 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 778 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी 1 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 631 बेड शिल्लक आहेत.

Copyright ©