जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे सचिव सुरेंद्रा राऊत यांनी तांदूळ तस्करी चे वृत्त प्रकाशित केल्यामुळे त्यांना रेशन तस्करांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या निंदनीय घटनेचा तीव्र निषेध स्व.पी.एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघ ,शाखा राळेगांव तालुका पत्रकार संघाचे वतीने करण्यात आला असून आरोपीला कडक शासन करावे,अशा प्रकारच्या घटना घडू नये याची दक्षता घ्यावी अशा आशयाचे तक्रार निवेदन अध्यक्ष प्राचार्य अशोक पिंपरे यांचे नेतृत्वात तहसिलदार डाँक्टर रविंद्र कानडजे यांना देण्यात आले आहे.
यावेळी प्रकाश मेहता,डाॅ.कैलास वर्मा,महेश शेंडे,फिरोझ लाखाणी, राजेश काळे,मंगेश राऊत,संजय दुरबुडे,रणजित परचाके,गुड्डू मेहता,राष्ट्रपाल भोंगाडे,रामू भोयर,सचिन राडे,जावेद पठाण,विलास साखरकर,राजू काळे,रितेश भोंगाडे सह अन्य मान्यवर उपस्थित होते..
Add Comment