Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात दोन पॉझिटिव्ह ; दोन कोरोनामुक्त जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2159 बेड उपलब्ध

2 ऑगस्ट रोजी लोकशाही दिन

यवतमाळ, दि. 29 जुलै : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 02 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाने ऐकूण घेतील व त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रसार कमी झाला असल्याने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे, मात्र लोकशाही दिनाला उपस्थित राहणाऱ्या अर्जदारांनी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. उपस्थितांनी सॅनिटायझरने हात वारंवार स्वच्छ करणे, सामाजिक अंतर ठेवणे, मास्क घालणे आवश्यक राहील. कोविड प्रतिबंधक उपायोजना केल्यानंतरच नागरिकांना कार्यालयात प्रवेश देण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.
______________________________________

यवतमाळ दि.29 जुलै : गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 959 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह असून उर्वरित 957 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ॲक्टीव पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 11 व जिल्ह्याबाहेर दोन अशी आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72799 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71002 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये महागाव येथील एक व नेर येथील एका रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 98 हजार 797 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 25 हजार 849 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.42 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.21 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2159 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 15 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2159 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 10 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 777 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 4 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 751 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी एक बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 631 बेड शिल्लक आहेत.

Copyright ©