यवतमाळ सामाजिक

पाढूर्णा (आदर्श) चे उच्च शिक्षित सरपंच रत्नदीप पवार यांचे उपक्रम ठरत आहे प्रेरणादायी

———————————————–
लाडखेड- दारव्हा तालुक्यातील पाढूर्णा (आदर्श) या ग्राम पंचायती ला काही महिन्या पूर्वी रत्नदीप यादवराव पवार हे उच्च शिक्षित सरपंच मिळाले. त्यांच्या जेमतेम कार्यकाळात त्यांनी हाती घेतलेले उपक्रम स्तुतीस पात्र ठरले असल्याने ईतरही ग्राम पंचायतीला प्रेरणादायी ठरत आहे.
या सरपंच्याने “माझी कन्या चंदन कन्या”हे नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले आहे. या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हा उपक्रम ते सर्वप्रथम आपल्या ग्राम पंचायतीमध्ये राबविण्याचा संकल्प केला आहे. यात गावातील जन्मतः मुली पासून तर पाच वर्षां पर्यंत च्या मुली ज्या घरात आहे. त्यांना चंदनाचे रोपटे देवून वृक्षारोण करून घेण्यास सुरुवात केली आहे. यात झाडे लावण्या सोबतच प्रत्येक पालकांच्या मनात मुलींना एक सन्मान निर्माण होईल. आणि त्या रोपट्याचे संगोपन सुध्दा चांगले होईल. पहिल्या टप्प्यात सत्तर मुलींना चंदनाचे रोपटे देवून त्यांचा सन्मान करण्याचे ठरविले आहे. यातून बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाला चांगली चालना मिळू शकतो. मुली विषयी आदर ठेवून जो उपक्रम सरपंच रत्नदीप पवार यांनी हाती घेतला तो उपक्रम महाराष्ट्रातील तमाम ग्राम पंचायतीने राबवावा असे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देण्याचे त्यांनी ठरविले आहे. आणि प्रत्येक ग्राम पंचायतीने राबवावे असे आवाहन सुध्दा त्यांनी केले आहे. अश्या उच्च शिक्षित सरपंच रत्नदीप यादवराव पवार यांचा दिनांक २८ जुलै बुधवारला वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसा निमित्त कोरोना चे सर्व निर्बंध बाळगून त्यांचा वाढदिवस चंदनाचे रोपटे देवून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. उच्च शिक्षित सरपंच गावाला मिळाल्याने नक्कीच गावाचा कायापालट होणार असल्याचे गावकऱ्यांनी मत व्यक्त केले आहे. यापुढेही नवनविन संकल्पना मनात बाळगून आपण अनेक उपक्रम ग्राम पंचायती मध्ये राबवू त्याचा फायदा इतरही ग्राम पंचायत ला होईल असे मत सरपंच रत्नदीप पवार यांनी पत्रकारशक्ती च्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखविले..

Copyright ©