यवतमाळ सामाजिक

मंगी भिमकूंड येथील शेतक-याचे रानडुक्कराने केले सोयाबीन पिकाचे नुकसान

 

वनविभागाने पंचनामे करावे शेतक-याची मागणी

घाटंजी:तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्य ला लागून असलेल्या मंगी सावरगाव भिमकूंड येथील अनेक शेतक-याच्या सोयाबीन व कापूस पिकामध्ये रानडुक्कराने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान करत असल्याने शेतकरी या वन्यजीवांचा नुकसानी मुळे हवालदिल होत असल्याचे चित्र टिपेश्वर अभयारण्य ला लागून असलेल्या मंगी सावरगाव भिमकूंड येथील शेतक-या कडून बोलल्या जात आहे. मंगी सावरगाव भिमकूंड शेतशिवाराला लागून मोठ्या प्रमाणात टिपेश्वर अभयारण्य चा जंगल लागून असल्याने या जंगलामध्ये वाघ हरीण रोही अस्वल रानडुक्करे यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने या अगोदर वन्य प्राण्यांकडून शेतक-यावर हल्ले सुध्दा झाले या वन्य प्राण्यांच्या भिती पोटी शेतकरी रात्रीच्या वेळी शेतीकडे फिरकत नसल्याने या संधीचा फायदा घेऊन रानडुक्करे मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी शेतक-या च्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे या कडे वनविभागाने लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा झालेल्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भिमकूंड व मंगी येथील नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहे.

Copyright ©