यवतमाळ सामाजिक

युवक काँग्रेसकडून पारवा येथे रक्तदान शिबीर संपन्न

 

कारगिल दिवस ते स्वातंत्र्य दिन उपक्रम

घाटंजी:तालुक्यातील सर्वात मोठा बाजारपेठ असलेल्या पैनगंगा पट्यातील पारवा येथे युवक काँग्रेसकडून रक्त दान शिबिर आयोजित करण्यात आली होती कारगिल विजय दिवस ते स्वतंत्र दिना पर्यंत आर्णी विधानसभेतील अनेक गावात रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे सुरवात घाटंजी तालुक्यातील पारवा येथून सुरवात करण्यात आली आज कांग्रेस चे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते सदर रक्त दान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या वेळी पारवा सर्कल मधील अनेक गावातील जेष्ठ कार्यकर्ते सह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पारवा सर्कल मधील अनेक रक्त दात्याने मोठ्या प्रमाणात रक्त दान केले असून अपेक्षा पेक्षा जास्त रक्त दान झाल्याने पारवा परीसरातील कार्यकर्ते यांचे शिवाजी राव मोघे यांनी अभिनंदन केले व रक्त दान केलेल्या रक्त दात्यांना माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले या शिबिराला पारवा परीसरातील नागरीक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Copyright ©