यवतमाळ सामाजिक

घाटंजी येथे विश्वरूप फाऊंडेशनच्या वतीने कारगिल दिनानिमित्य शाहीदांना मानवंदना

———————————————
‌घाटंजी- दिनांक 26/07/2021 रोजी बस स्थानक परिसर,घाटंजी येथे विश्वरूप फाऊंडेशनच्या वतीने कारगिल दिनानिमित्य शाहीदांना मानवंदना देण्यात आली,.यावेळी कारगिल दिनाचे औचित्याने कारगिल शाहिद,चिपळूण व रायगड,कोल्हापूर जिल्हा येथील पुरात वाहून गेलेल्यांना लोकांचे स्मरण करून कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रती सद्भावना व्यक्त केली,कारगिल युद्धाविषयी सांगतांना सुरुवातीला 3 मे 1999 मध्ये नामज्ञान या मेंढपाळाला कारगिल शिखरावर सर्वप्रथम घुसखोर दिसले व त्यांनी ही माहिती त्याने तातडीने पोलिसांना दिली,तिथूनच सैनिकांनी कारगिल विजयाची गाठ बांधली व 26 जुलै ला अंतता विजय मिळविण्यात यशस्वी कामगिरी भारतीय जवानांनी केली,यात शेकडो जवानांना वीरमरण आले व देशासाठी शहीद झाले,त्यांच्यामुळेच आपण व आपले कुटुंब निडर,सुरक्षित आहोत,असे मत विश्वरूप फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सुनील नगराळे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शुभम नगराळे हे होते,तर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती बन्सोड काका,कनाके साहेब (एस टी कर्मचारी)हे होते.या कार्यक्रमाच्या वेळी संतोष ओंकार,अध्यक्ष विश्वरूप फाऊंडेशन, पुरी भाऊ,केतन धुर्वे,सारंग क्षीरसागर,शेख शाकिर,महेश वानखडे या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती,या कार्यक्रमाचे सूत्र संचालन जितेंद्र मुनेश्वर यांनी तर आभार प्रदर्शन प्रतीक पाटील यांनी केले.

Copyright ©