यवतमाळ राजकीय

शिवसेना यवतमाळ तालुका महिला संघटिका म्हणून अंजली गिरी यांची निवड

——————————————-
यवतमाळ- शिवसेनेचे ध्येय धोरण सर्वसामान्य महिला पर्यंत पोहचविण्यासाठी व महिला संघटन वाढीच्या दृष्टीने बेलोरा ग्राम पंचायत मध्ये सदस्य सदस्य पदावर असणाऱ्या अंजली ताई संदीप गिरी यांच्या कार्याची दखल घेऊन शिवसेनाप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार यवतमाळ तालुका महिला संघटक म्हणून नियुक्ती पत्र देवून जिल्हा महिला संपर्क संघटक (यवतमाळ- वाशिम) शिल्पाताई देशमुख यांनी नुकतीच नियुक्ती केली.
आपली नियुक्ती ही महिला साठी सतत धडपड करून कार्य करीत राहतो याची पावती असून आपण येणाऱ्या काळात घर तिथे शिवसैनिक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सोबतच पक्ष वाढीसाठी भरीव कार्य करून जास्तीत जास्त महिलांना सक्षम नेतृत्व मिळवून देणार आहोत. आपल्यावर विश्वास दाखवून जी नियुक्ती दिली त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही असे नवनिर्वाचित तालुका संघटिका अंजलीताई गिरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या या निवडीने सर्वत्र स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. ते आपले निवडीचे श्रेय सर्व शिवसेना पदाधिकारी व बेलोरा ग्रामवासियांना दिले आहे.

Copyright ©